आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा, मुस्लिम संघटनांनी केले आरक्षणाचे स्वागत; तरुण व शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरीत फायदा शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मराठा व मुस्लिमांना शिक्षण, नोकर्‍यांत आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे शहरातील मराठा व मुस्लिम संघटनांनी स्वागत केले. या निर्णयाचा ग्रामीण भागातील तरुणांना व शेतकर्‍यांना फायदा होइल, असा विश्वास विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

मराठा समाजासाठी शिक्षण व नोकरीमध्ये 16 टक्के, तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे मराठा व मुस्लिम समाजातील तरुण-तरुणींना शिक्षण व नोकरीत फायदा मिळणार आहे. नारायण राणे समितीच्या शिफारशी विचारात घेऊन सरकारने हे आरक्षण मंजूर केले. मराठा समाजास इतर मागास वर्गात समाविष्ट करण्याची शिफारस फेटाळत सरकारने पूर्वीच्या आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र शैक्षणिक सामाजिक प्रवर्ग तयार केला आहे. या निर्णयामुळे राज्यात आरक्षण 73 टक्क्यांवर गेले आहे.

आरक्षणासाठी विविध मराठा संघटनांनी पाठपुरावा केला, आंदोलने केली. यात अ. भा. मराठा सेवा संघ, शिवराज्य, संभाजी ब्रिगेड, अ. भा. मराठा महासंघासह इतर पक्ष व संघटनांचा समावेश होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा व मुस्लिम मते मिळवण्यासाठीची ही राजकीय खेळी आहे, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतरही मूळ प्रश्न सुटला नसल्याचे अ. भा. मराठा सेवा संघ व शिवराज्य पक्षातर्फे सांगण्यात आले. मराठा समाजाला 25 टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी मराठा सेवा संघातर्फे करण्यात आली आहे. मराठा समाजास इतर मागास वर्गात सामाविष्ट करावे, अशी शिवराज्यची मागणी आहे.
मराठा महासंघाच्या आंदोलनास यश
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना व शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. 1981 पासून मराठा महासंघ राज्यभर आंदोलन करत होते. याला आलेले हे यश आहे. याबद्दल राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांचे आभार.’’
संभाजी दहातोंडे, जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघ
लढाई संपलेली नाही...
आमची मूळ मागणी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण न देता इतर मागास वर्गात समाविष्ट करावे ही आहे. त्यासाठी आमचा लढा सुरू राहील. मराठा समाजाने एवढ्यावर हुरळून न जाता इतर मागास वर्गात सामाविष्ट होण्यासाठी कटिबद्ध राहावे.’’
संजीव भोर, शिवराज्य पक्ष.
मुस्लिम समाजासाठी हिताचा निर्णय
हा निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु कायद्याच्या चौकटीवर काय होते ते पाहावे लागेल. न्यायालयातही सरकारची बाजू भक्कम राहिली तर मुस्लिम समाजासाठी हिताचे राहील.’ अर्शद शेख, जमात-ए-इस्लाम-ए-हिंद
विद्यार्थ्यांचा फायदा
४ याअगोदर संपूर्ण शुल्क भरावे लागत होते. या ऐतिहासिक निर्णयामुळे शिक्षण शुल्कात सवलत मिळेल. गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.’’ अनिल टेमघरे, विद्यार्थी.
मराठा तरुणांना होणार लाभ
४ सरकारने दिलेल्या या सवलतीमुळे मराठा समाज पुढे येईल. नोकरीमध्ये मराठा तरुणांना संधी मिळेल. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री व सरकारचे अभिनंदन.’’ रत्नाकर ए. ठाणगे, राष्ट्रवादी काँग्रेस अपंग संघटना.