आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reservation News In Marathi, Vadar Community Reservation Issue

वडार समाजाला आरक्षण द्या : शिवाजी शेलार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत वडार समाजाचा अनुसूिचत जाती-जमातींमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातील वडार समाजाचाही अनुसूचित जाती-जमातींमध्ये समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी भारतीय वडार समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शेलार यांनी रविवारी केली.

वडार समाज संघटनेच्या बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपाध्यक्ष रामदास पाटील, सचिव बाबूराव हुलगुंडे, कार्याध्यक्ष बबनराव मोहिते, प्रदेशाध्यक्ष भीमाशंकर आनंदकर, प्रदेश उपाध्यक्ष बंडू देवतळे, वसंत आलकुंटे, माजी नगरसेवक नितीन शेलार आदी या वेळी उपस्थित होते.
शेलार म्हणाले, राज्यात आतापर्यंत झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांपुढे वडार समाजाचे प्रश्न मांडण्यात आले. प्रत्येक वेळी संघर्ष करण्यात आला. मात्र, कुठलाही प्रश्न आतापर्यंत सुटलेला नाही. देशात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अन्य समाजाला आरक्षण दिले जाते, मग दगड, खडी फोडणा-या या समाजाला आरक्षण का नको? महाराष्ट्रात राहिलो ही आमची चूक झाली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अन्य राज्यांत समाजाला आरक्षण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही समाजाला आरक्षण द्यावे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटून त्यांच्यासमोर समाजाचे प्रश्न मांडण्यात येतील. येत्या काही दिवसांत शहा यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे वडार समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे. आगामी काळात देशभर संघटनेच्या माध्यामातून काम करण्यात येणार आहे. वडार समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे, मुलींना शिक्षणात सवलती द्याव्यात, स्वतंत्र महामंडळ स्थापन करून आर्थिक मदत द्यावी व घरकुले द्यावीत, अशा मागण्या शिंदे यांनी केल्या.