आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण एजंटांकडून लहान स्टेशन ‘लक्ष्य’, आरक्षणासाठी मुंबईच्या एजंटांनी पसरवले स्टेशनवर जाळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मोठ्या स्टेशनवर टोकन पद्धती एकूण व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात आरक्षणाची तिकिटे काढण्यात येणाऱ्या अडचणी पाहून मुंबईच्या एजंटांनी नगर जिल्ह्यातील पढेगाव, चितळी, पुणतांबे, कान्हेगाव नाशिक जिल्ह्यातील येवलासारख्या छोट्या स्टेशनवर आपला मोर्चा वळवला आहे. या स्टेशनवर आरक्षणातील उलाढाल थक्क व्हावी, अशी असल्याची धक्कादायक माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली.
नगरच्या स्टेशनवर आरक्षण विशेषत: तत्काळच्या आरक्षणातील गैरव्यवहार एजंटांना खुलेआम सूट असल्याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केल्यावर मोठी खळबळ उडाली. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी त्यात दखल घेऊन नगरच्या रेल्वेस्टेशनवरील वरिष्ठांना कडक समज दिली. पण, परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. कारण प्रवासीही सहकार्य करत नसल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार टोकन पद्धतीमुळे नगर शिर्डी येथे अशा प्रकारच्या गैरप्रकारांना प्रतिबंध झाला आहे. शिवाय फिरत्या पथकाच्या अचानक पडणाऱ्या छाप्यांत जर कोणी सापडले, तर होणाऱ्या शिक्षा अतिशय कडक असतात. त्यामुळे रेल्वेचे कर्मचारी असे प्रकार करण्यात धजावत नाहीत.

पण, छोट्या स्टेशनची परिस्थिती अशी नाही. पढेगाव, चितळी, पुणतांबे, कान्हेगाव येवला स्टेशनवरील आरक्षणातील उलाढाल प्रचंड मोठी आहे. मुंबई पुण्याचे मोठे एजंट तेथे येतात. ते प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर आगाऊ रक्कम घेतात. ते अनेक दिवस मुक्काम करतात. त्यांनी स्थानिक तरुणांचे जाळेही तेथे निर्माण केले आहे. त्यांनाही मोठी कमाई होत असल्यामुळे त्यांचे या एजंटांना मोठे सहकार्य होत आहे. या स्टेशनांवरील आरक्षणातील उलाढाल मोठ्या स्टेशनप्रमाणे असल्याची माहिती समजली.

स्टेशनवरील वरिष्ठाचे गुंतले हात
छोट्यास्टेशनवरील आरक्षणातील गैरप्रकारांत थेट वरिष्ठांंचे हात गुंतलेले असल्याची धक्कादायक माहिती रेल्वेच्या सुत्रांनीच दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार इतक्या मोठ्या प्रमाणातील गैरप्रकार त्याशिवाय शक्यच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

‘तत्काळ"वर एजंटांचा कब्जा
प्रवाशांना ऐनवेळी आरक्षण मिळावे, यासाठी असलेली तत्काळ आरक्षण यंत्रणा पूर्णपणे एजंटांच्या ताब्यात गेली आहे. यात थेट वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतल्याने सामान्य प्रवाशांना हातात ‘वेटिंग’चेच तिकीट पडत आहे.

कष्ट कमी कमाई मोठी
एकाफॉर्मवर असलेल्या नावांपैकी प्रत्येक प्रवाशामागे एजंटाला किमान तीनशे रुपये मिळतात. म्हणजे एका फॉर्मवर सहा प्रवासी असतील, तर एजंटाला १८०० रुपये मिळतात. ‘तत्काळ’ तिकीट काढण्याचा सगळा खेळ तीन-चार तासांचा असतो. त्या वेळेत असे १५-२० प्रवाशांचे कन्फर्म बुकिंग केले, तर पाच-सहा हजारांची सहज कमाई होते. त्यामुळे या धंद्यात मोठी उलाढाल होत आहे. त्यात अनेकांचे हितसंबंध गुंतले असले आहेत.

टोकनच्या खिडकीसमोर फॉर्मचा गठ्ठा
विभागीय व्यवस्थापकांनी सूचना देऊनही टोकन मिळत असलेल्या एक क्रमांकाच्या खिडकीवर आरक्षणाच्या फॉर्मचा गठ्ठा पडलेला होता. त्यावर क्रमांक टाकलेल्या फॉर्मचे ‘मालक’तेथे उपस्थित नव्हते. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याने फॉर्मची तपासणी केली असता, हे स्पष्ट झाले. प्रवासीच रात्रीपासून तेथे येऊन फॉर्मवर क्रमांक टाकून असा गठ्ठा ठेवतात, असे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले.

रेल्वे पोलिसांचे एकमेकांकडे बोट
रेल्वेच्यातत्काळ आरक्षणाच्या व्यवस्थेवर दररोज लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी आपली माणसे तेथे नेमायला हवी, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण, यासाठी मनुष्यबळ नाही, अशी कैफियत एका रेल्वे सुरक्षा रक्षकाने मांडली. त्याच्या म्हणण्यानुसार मागणी करूनही आरक्षण खिडक्यांवर सीसीटीव्ही बसवले जाण्यामागे रेल्वेतील वरिष्ठांचे यातील हितसंबंध गुंतले असण्याचे कारण आहे.

विमानाने येऊन रेल्वेचे बुकिंग
एजंटलहान स्टेशनवर बुकिंंग करून नंतर शिर्डीला जातात. तेथून विमानाने मुंबईला जात असल्याची धक्कादायक माहिती रेल्वेच्याच सुत्रांनी दिली. यावरून या आरक्षणाच्या धंद्यातील कमाईचा अंदाज येऊ शकतो. नगरहून जाणाऱ्या पाटणासारख्या गाड्यांचे बुकिंग सुरू होतात. फक्त पाच मिनिटांत संपूर्ण गाडी बूक होते. कारण एजंटांचे विस्तृत जाळे त्यासाठी अनेक स्टेशनांवर कार्यरत असते.

सुधारणा झाल्यास उपोषण करणारच
^‘दिव्यमराठी’तीलवृत्तानंतर रेल्वेच्या आरक्षणातील एजंटगिरीविरोधात मी विभागीय रेल्वे व्यवस्थापकाकडे तक्रार केली आहे. त्यांनीही तातडीने दखल घेऊन संबंधितांना सूचना केल्या आहेत, तरीही गैरप्रकार सुरू असतील, तर त्यांची तक्रार केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे करणार आहे. आरक्षणातील गैरव्यवहारांसह इतर अनेक प्रश्नांबाबत प्रवाशांना घेऊन आपण नगरच्या रेल्वे स्टेशनवर उपोषण करण्यावर ठाम आहोत.'' हरजितसिंग वधवा, सदस्य,रेल्वे विभागीय सल्लागार समिती.