आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणाअभावी धनगर समाज मागे; धनगर समाजाचा ‘एसटी’त समावेशासाठी रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे- राज्य घटनेने 65 वर्षांपूर्वीच धनगर समाजाला आरक्षण दिले आहे. परंतु राज्यशासन टाळाटाळ करीत आहे. आरक्षणाअभावी धनगर समाज उच्चपदावर पोहोचू शकलेला नाही, अशी खंत आरक्षण कृती समितीचे अशोक कोळेकर यांनी व्यक्त केली. भंडारा उधळण करत व मल्हारी मार्तंडाचा जयघोष करीत शुक्रवारी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशाच्या मागणीसाठी धनगर समाजाने मेंढरांसह नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी केळेकर बोलत होते. तहसीलदार हेमलता बडे यांना आंदोलकांनी निवेदन दिले. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष कान्हू अण्णा दाणे व कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने हे आंदोलन केले.
यावेळी भाजपचे अनिल ताके, शिवसेनेचे रामदास गोल्हार, शिवसेनेचे प्रकाश शेटे, मनसेचे दिलीप मोटे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, राष्टÑवादी काँग्रेसचे विश्वास गडाख, समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले, विश्व हिंदू परिषदेचे नवनीत सुरपुरिया आदी सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला. रास्ता रोको आंदोलनानंतर अंबाडे पेट्रोलपंपाच्या आवारात झालेल्या जाहीर सभेत भाषणे झाली. यावेळी संतोष तागड, सुनील वीरकर, सोपान भगत, नवनाथ सोलट, अ‍ॅड. एस. डी. गांगले, राजेंद्र गायकवाड, प्रवीण कोकाटे, नामदेव खंडाळे यांनी भाषणे केली. लक्ष्मण घुले यांनी आभार मानले.