आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसिडेन्शिअल कॉलेजच्या प्राध्यापकाची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - येथील रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेजमधील प्रा. सुरेश भगवंत नवले (४५, कान्हूरपठार, ता. पारनेर) यांनी निंबळक बायपासजवळ सोमवारी सकाळी आत्महत्या केली. नवले यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून संचालक मंडळाच्या एका जवळच्या माणसाकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.
प्रा. नवले लालटाकी रस्त्यावरील रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेजमध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक होते. ते दररोज नगर-कान्हूरपठार असा प्रवास करत. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कान्हूरपठारहून कॉलेजला येण्यासाठी निघाले. साडेदहाच्या सुमारास निंबळक बायपासजवळच्या रेल्वे पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ असलेल्या पिशवीत काही कागदपत्रे चिठ्ठी सापडली. चिठ्ठीमध्ये संस्था चालकांच्या जवळच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. काहीजणांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून नवले यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.