आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Responsibility Distributed To Activist For Janlokpal Agitation In Gramsabha

ग्रामसभेत जनलोकपाल आंदोलनाच्या जबाबदा-यांचे तरुणांना वाटप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राळेगणसिद्धी - जनलोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 10 डिसेंबरपासून जाहीर केलेल्या उपोषणाची पूर्वतयारी करण्यासाठी मंगळवारी यादवाबाबा मंदिरात ग्रामसभा झाली. आंदोलनाच्या जबाबदा-यांचे वाटप या वेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले.अण्णांचे उपोषण सुरू झाल्यानंतर आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणा-या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी नियोजन केले. गावातील अनेक तरुणांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दाखवली. इतर राज्यांतून अनेक कार्यकर्ते राळेगणसिद्धीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार भोजनाची सोय व इतर सोयींसाठी चर्चा होऊन विविध जबाबदा-या ठरवून देण्यात आल्या.
आंदोलन करणे हे दुर्दैव
पंतप्रधानांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन वर्षे उलटली, तरी जनलोकपाल अस्तित्वात आले नाही. संसद आणि पंतप्रधानांच्या आश्वासनानंतरही पुन्हा आंदोलनाची वेळ यावी हे दुर्दैव म्हणावे लागेल. दोन वर्षांत दहा - बारा वेळा पत्रव्यवहार झाला असताना त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे अण्णांनी सांगितले.