आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त सैनिकांसाठी १३ ला मेळावा,सैनिक त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष सुविधा मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर,सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्यांतील लष्कराचे निवृत्त सैनिक, नौसैनिक त्यांच्या कुटुंबीयांसाठी १३ नोव्हेंबरला नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलमध्ये (एसीसीएस) विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती एसीसीएसच्या एज्युकेशन ऑफिसर गीता महाडिक यांनी बुधवारी दिली.
या मेळाव्यात निवृत्त सैनिक, अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसाठी खास वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात हाडांचे विकार, कान, नाक, डोळे यांचे विकार, स्त्री रोगविषयक निदान शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. ज्या बँकांद्वारे सैनिकांना निवृत्ती वेतन देण्यात येते, त्या बँकांचे स्टॉल या मेळाव्यात असतील. या बँकांद्वारे निवृत्तीवेतनधारकांना आपल्या खास योजनांची माहिती देतील. तेथे निवृत्तीवेतनाबाबत असणाऱ्या अडचणी वेतन लेखा कार्यालयाद्वारे दूर करण्यात येतील. मेळाव्यात जागेवर झेरॉक्स लिपिकाची व्यवस्था असेल.

येथे असलेल्या माहिती सूचना केंद्रात सरकारच्या विविध योजनांची माहिती माजी सैनिकांना देण्यात येईल. त्यात शैक्षणिक संस्थांतील आरक्षण, इतर माहितीचा समावेश असेल. माजी सैनिकांना पुन्हा रोजगार मिळवण्यासाठी खास कक्ष असणार आहे. लष्करातील भरती विषयक माहितीही या मेळाव्यात देण्यात येणार आहे.

याशिवाय सीएसडी नॉन सीएसडी कँटिनची सुविधाही मेळाव्याच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. सैनिक त्यांच्या कुटुंबीयांसाठी सोलापूर रस्त्यावरील ‘वाय’ जंक्शन, तारकपूर बसस्थानक, माळीवाडा बसस्थानक, स्वस्तिक बसस्थानक आणि रेल्वेस्टेशनपासून ने-आण करण्यासाठी एसीसीएसतर्फे खास बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...