आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधाऱ्यांनो, तुम्हाला पुन्हा मतदान करणार नाही; सेवानिवृत्त संघटनांचा निर्धार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, राज्य परिवहन निवृत्ती कर्मचारी संघटना निवृत्त कर्मचारी ईपीएस ९५ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने सक्कर चौक येथील अक्षता गार्डन येथे सेवानिवृत्तांचा राज्यस्तरीय मेळावा झाला. या मेळाव्यात ‘देश के पेन्शनर्स एक हो’ची घोषणा देवून, पेन्शनर्सच्या प्रश्नासाठी सर्व पेन्शनर्स संघटनांनी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सत्ताधाऱ्यांनो, तुम्हाला पुन्हा मतदान करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

 

महाराष्ट्रातील सर्व संघटना मिळून समन्वय समिती स्थापन करुन, पेन्शन वाढच्या प्रश्नावर एकच व्यासपिठाच्या माध्यमातून आंदोलन करणयाचे यावेळी ठरले. तसेच सन २०१८ पूर्वी तीन हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह केंद्र सरकारने मंजूर केल्यास सत्तधाऱ्यांविरोधात मतदान करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. पाहुण्यांचे स्वागत आनंद वायकर यांनी केले. 

 

यावेळी कॉ. अतुल दिघे, प्रकाश येंडे, प्रकाश पाठक, देवराव पाटील, सुधाकर गुजराती, कॉ. विजय कुलकर्णी, रमेश गवळी, एस. एल. दहीफळे, अतुल दिघे, सुभाष कुलकर्णी, गोरख कापसे, ज्ञानदेव आहेर, बाबुराव दळवी व्यासपिठावर उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष कुलकर्णी यांनी केले. ते म्हणाले, सर्व पेन्शनर्स संघटनांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी एकत्र येऊन लढा उभारला आहे. यापूर्वी एकजूट नसल्याचा फायदा सरकारने उचलला होता. मात्र, आता सर्व संघटनांचे पेन्शनर्स एकवटले आहेत. 

 

या मेळाव्यात सर्व पेन्शन धारकांना हजार पाचशे रुपयाच्या पेन्शनसह केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, माजी खासदार भगतसिंह कोशियारी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, दर्जेदार मोफत वैद्यकिय सेवा द्यावी. अन्नसुरक्षा कायदा लागू करावा. सन १९९५ च्या पेंन्शन कायद्यात दुरुस्ती करुन सुत्रात बदल करावे, अन्य कारणाने अथवा वयाच्या ५८ व्या पुर्वी निवृत्ती घेतलेल्यांना पूर्ण पेन्शन द्यावी, २४ जुलै २००९नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षाचे वेटेज, तसेच रिर्टन ऑफ कॅपीटल फरकचा लाभ देण्यात या मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. 

 

यावेळी बी. एल. कदम, विष्णुपंत टकले, शरद नेहे, शिवाजी औटी, शिवाजी कोठवळ, रामदास रहाणे, नवनाथ साबळे, बी. जी. काटे, बापू सोनवणे, यु. एन. लोखंडे, महेमुद पटेल, अर्जुन बकरे, एस. एल. दहीफळे, भलभीम कुबडे, बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. पेन्शनर्सना मोफत प्रवास, आरोग्य सुविधा रेशन मिळण्याची आशा कॉ. अतुल दिघे यांनी व्यक्त केली. प्रकाश पाठक यांनी कायद्यात पेन्शन वाढची तरतूद असूनही पेन्शनर्सना संघर्ष करावा लागतो. ईपीएफ मध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाला असून, त्यामुळेच पेन्शन लांबणीवर टाकली. 

 

म्हातारपण सुखाचे व्हावे 
कॉ.अतुल दिघे म्हणाले, पेन्शनर्सची एकजूट करण्यास नगर जिल्ह्याला यश आले आहे. पेन्शनर्सना सन्मानाने जगण्यासाठी माजी खासदार भगतसिंह कोशियारी समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची गरज आहे. देशाच्या विकासात या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. भांडवलदारांची कोट्यावधी रुपयांची कर्जमाफी केली जाते. मात्र पेन्शनर्सना पेन्शन वाढ दिली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांचे म्हतारपण सुखाचे होणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. 

 

खासदारांचे आश्वासन 
प्रत्येकाच्या योगदानातून देशाचा विकास झाला. नोकरीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी देशाला उभे केले. केंद्र सरकारने प्रथमच सरसकट सर्वांना एक हजार रुपयाची पेन्शन दिली. हे सरकार पेन्शनर्स बाबतीत सकारात्मक पाऊल उचलणार आहे. या मेळाव्यास माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट देऊन पेन्शनर्सचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार मंत्र्यांशी चर्चा करू, असे खासदार गांधी यांनी सांगितले. पेन्शनर्सचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...