आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Return Rains Read One Half Thousand Crore Animals

परतीच्या पावसामुळे वाचले दीड हजार कोटी, चौदा दिवसांनंतरही प्रशासनाला आदेश नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला अाहे. त्यामुळे जिल्ह्यात जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी होणारा राज्य सरकारचा सुमारे दीड हजार कोटींचा खर्च वाचणार अाहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र छावण्यांचा निर्णय मागे घेतला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण शनिवारी "दिव्य मराठी'शी बोलताना दिले. दरम्यान, छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेऊन चौदा दिवस उलटले, तरी अद्यापि प्रशासनाला त्याबाबतचा आदेश मिळाल्याने संभ्रम वाढला आहे.

जूनच्या प्रारंभी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात जनावरांच्या चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दराने जनावरांची विक्री करावी लागत होती. जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यांत नेण्यास बंदी घातली होती. मात्र, तरीदेखील चोरट्या मार्गाने चारा शेजारच्या जिल्ह्यांत विक्रीसाठी जात होता. त्यामुळे ही बंदी कागदावरच राहिली होती.

चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगर, जामखेड, कर्जत, पारनेर, शेवगाव, पाथर्डी श्रीगोंदे या तालुक्यांत जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचा निर्णय सप्टेंबरला मंत्रिमंडळाने घेतला होता. जनावरांच्या छावण्यांसाठी सुमारे दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. छावण्यांचा निर्णय झाला, त्याच्या आदल्या दिवशी सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर जिल्ह्यात होते. त्यांनी पारनेर, पाथर्डी जामखेड येथे भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. फडणवीस दौरा आटोपून गेल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून (५ सप्टेंबर) जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. त्याच दिवशी मंत्रिमंडळाने नगर जिल्ह्यात छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

सप्टेंबरपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. गेल्या तेरा दिवसांत ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पाणी चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी लागणारा दीड हजार कोटींचा खर्च वाचणार आहे. छावण्यांचा निर्णय बारगळण्याची शक्यता असतानाच महसूलमंत्री खडसे यांनी मात्र छावण्या सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महसूलमंत्री छावण्यांबाबत ठाम असतानाच चौदा दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाने छावण्या सुरू करण्याबाबतचा घेतलेल्या निर्णयाचा आदेशच जिल्हा प्रशासनाला मिळालेला नाही. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.

प्रतिदिन साडेपाच कोटी खर्च अपेक्षित
जिल्ह्यातसाडेआठ लाख लहान-मोठी जनावरे आहेत. छावणीत मोठ्या जनावराला ६० ते ७० रुपये, तर लहान जनावराला ४० ते ५० रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दहा ते वीस छावण्या सुरू करण्यात येणार होत्या. छावण्यांसाठी प्रशासनाला दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. एका दिवसाला या छावण्यांवर साडेपाच कोटी खर्च होणार होता.

छावण्यांसाठी अर्जाचा ढीग
जिल्हाधिकारीकार्यालयातील टंचाई विभागाकडे विविध सहकारी संस्था, सहकारी सोसायट्या, दूध संघ, सहकारी साखर कारखाने सामाजिक संस्थांनी जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी गेल्या बारा दिवसांपासून अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत विविध संस्थांचे दीडशेहून अर्ज प्रशासनाकडे आले आहेत. त्या अर्जांवर अजून निर्णय झालेला नाही.

जिल्ह्यात ७०.४१ टक्के पाऊस
नगरजिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारी काही प्रमाणात कमी झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ७०.४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मुळा, भंडारदरा, निळवंडे, आढळा, मांडआेहोळ, घोड सीना धरणातील पाणीसाठ्यात काहीअंशी वाढ झाली आहे. नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात शनिवारी ५४.६३ टक्के पाणीसाठा होता.

अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
^छावण्यासुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे. तो मागे घेतला जाणार नाही. छावण्यांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. परिस्थिती पाहून ते छावण्या सुरू करू शकतात. रब्बी हंगामात ज्या भागातील पिके वाया जातील, त्या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बी-बियाणे हेक्टरी पंधराशे रुपये अनुदान देण्यात येईल.'' एकनाथखडसे, महसूलमंत्री.