आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revenu Dept Nagar Action Illigal Sand Stone Material

गौण खनिजाची वाहतूक करणा-या 13 ट्रकवर कारवाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रांताधिकारी ए. एस. रंगानायक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शुक्रवारी (13 जानेवारी) रात्रीत बेकायदा गौण खनीज वाहतूक करणा-या 13 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन लाखांहून अधिक दंड वसूल होऊ शकेल, अशी माहिती रंगानायक यांनी दिली.
ही कारवाई प्रांताधिकारी ए. एस. रंगानायक यांच्या मार्गदर्शनाखील तहसीलदार गणेश मरकड, शिरस्तेदार शेषराव शिंदे, विजय चव्हाण, तलाठी कैलास साळुंके यांनी केली. महसूल खात्याच्या अधिका-यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणा-यांसह इतर गौण खनिजाची वाहतूक करणा-यांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे.
शुक्रवारी (13 जानेवारी) रात्रभर महसूल विभागाचे पथक नगर-मनमाड, नगर-औरंगाबाद, नगर-पाथर्डी या मार्गावर सुमारे 13 वाहनांवर कारवाई केली. कारवाईतील वाहने पहाटेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्याची कार्यवाही सुरू होती. आवारात जागा नसल्याने जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या बाजूलादेखील काही वाहने लावण्यात आली. कारवाई सुरूच असल्याने कारवाईचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बेकायदा गौण खनीज वाहतूक करणा-यांविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम सुरूच राहणार आहे.
कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये आठ वाळू, दोन माती, एक खडी व दोन डबर असलेल्या मालमोटारींचा समावेश आहे. या धडक कारवाईमुळे गौण खनिजांची तस्करी करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
तालुकानिहाय पथकांची नेमणूक
महसूल बुडवून बेकायदा गौण खनिजाची वाहतूक करणा-यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी तालुकानिहाय पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सदानंद जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी.