आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हर बंद पडल्यामुळे, लाख सातबारे पडून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नागरिकांच्या पैशांची वेळेची बचत व्हावी, यासाठी महसूल विभागाच्या अनेक सेवा ऑनलाइन करण्यात आल्या. तथापि, महिन्यातील बहुतांशी दिवस महसूलचे सर्व्हर बंद असल्यामुळे या ऑनलाइन सेवांचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या बारा दिवसांपासून महसूल विभागाचे सर्व्हर बंद असल्यामुळे एक लाख शेतकऱ्यांचे सात-बारा तलाठ्यांकडून पडून आहेत. त्यामुळे तलाठ्यांचा ताप वाढला आहे.
तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने महसूलच्या सर्व शासकीय सेवा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यात शेतीचा सातबारा, जातीचे प्रमाणपत्र, जमिनीच्या नावनोंदणीसह अन्य सेवा ऑनलाइन करण्यात आल्या. शेतीचा सातबारा घेण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत. त्यात वेळ पैसा वाया जात होता. शेतकऱ्यांचा वेळ पैसा वाचवण्यासाठी सातबारा संगणकीकृत करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागात तलाठी कार्यालयामार्फत सातबारा ऑनलाइन मिळू लागला.

दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने सातबारा डेटा स्कॅनिंग करण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये खास कक्ष सुरू करण्यात आला. सातबारा डेटा स्कॅनिंगसाठी प्रशासनाने खास ई-स्कॅनिंग नावाचे सॉफ्टवेअर तयार केले. स्कॅनिंग झाल्यानंतर सातबारा उतारा थेट शेतकऱ्यांच्या हातात देण्यात येणार होता. मात्र, महसूल विभागाचे सर्व्हर महिन्यातील किमान १० ते १५ दिवस बंद रहात असल्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऑनलाइन सेवा असतानाही नागरिकांना एका कामासाठी शासकीय कार्यालयात पाच-सहा वेळा चकरा माराव्या लागतात.

पाच महिन्यांपूर्वी महसूलचे सर्व्हर अनेक दिवस बंद होते. आता पुन्हा गेल्या बारा दिवसांपासून सर्व्हर बंद पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत ऑनलाइन सातबारा देण्याचे काम रखडले आहे. नगर शहर आणि परिसरातील सावेडी, केडगाव बुऱ्हाणनगर या भागातील सातबारा उताऱ्यांच्या नोंदीचे काम रखडले आहे. सर्व्हरचा वेग कमी असल्यामुळे उतारे देण्यासाठी विलंब होतो. जिल्ह्यातील लाख शेतकऱ्यांचे सातबारा तलाठी कार्यालयात पडून आहेत. सातबारासाठी शेतकरी तलाठी कार्यालयात गेल्यानंतर तेथे सर्व्हर बंदचे कारण सांगितले जाते. त्यावरून अनेकदा तलाठी शेतकऱ्यांमध्ये वाद होतात.

दरम्यान, उपनगरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. सर्व्हर बंद असल्यामुळे हे व्यवहार बारा दिवसांपासून पूर्णपणे बंद आहेत. त्याचा फटका नागरीकांना बसत आहे.

हस्तलिखित सातबारा मिळेना...
पूर्वी हस्तलिखित दाखले, सातबारा दिले जायचे. ऑनलाइन सेवा सुरू केल्यामुळे हस्तलिखित दाखले देण्याचे बंद करण्यात आले. आता महसूलचे सर्व्हर बंद पडल्यामुळे हस्तलिखितही नाही ऑनलाइनही सातबारा मिळत नाही. एका दाखल्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. केडगाव, सावेडी या उपनगरांचा विस्तार झपाट्याने होत आहे.

सर्व्हर सुरू झाले, पण वेग कमी
^मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरलाराज्य तलाठी संघटनेची बैठक घेऊन सर्व्हरबाबत चर्चा केली. आणखी तीन सर्व्हर देण्याचे, तसेच ३१ डिसेंबरपर्यंत सॉफ्टवेअर दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप राज्यासाठी तीन स्वतंत्र सर्व्हर मिळालेले नाहीत. बारा दिवसांपासून सर्व्हर बंद होते. आता काही ठिकाणी सर्व्हर सुरू झाले असले, तरी त्यांचा वेग कमी असल्यामुळे त्यात अतिरिक्त डाटा लोड झाल्यामुळ‌े सातबारा देण्यात अडचणी येत आहेत.'' गणेश जाधव, अध्यक्ष, तलाठी संघटना.
बातम्या आणखी आहेत...