आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revenue Minister Balasaheb Thorat,Latest News In Divya Marathi

दुधाला 1.70 रुपये प्रतिलिटर फरक देण्यात येईल- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- सहकाराच्या माध्यमातून तालुक्याच्या वैभवात मोठी भर पडली आहे. दुग्ध व्यवसायातून शेतकरी व तालुक्याच्या अर्थकारणाला बळकटी देणारा संगमनेर दूध संघ यावर्षी दूध उत्पादकांना प्रतिलिटर 1 रुपया 70 पैशांप्रमाणे फरक देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाची 37 वी वार्षिक सभा थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी (27 जुलै) झाली. दूध फरकाची घोषणा थोरात यांनी केल्यानंतर दूध उत्पादकांनी या निर्णयाचे स्वागत केले. अध्यक्षस्थानी दूध संघाचे अध्यक्ष रामनाथ राहाणे होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, उपसभापती बाळासाहेब गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, तालुक्याने प्रतिकूल परिस्थितीत भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्शावर वाटचाल करत राज्यात विकासात नावलौकिक मिळवला. संगमनेर सहकाराबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिकदृष्ट्या राज्यात अग्रेसर ठरले. दूध व्यवसायात चढउतार येत असले, तरी या संघाची वाटचाल कायमच चढती ठरली. मुक्त संचार गायगोठा या रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील संघाच्या उपक्रमातून दूध उत्पादकता वाढली आहे. दुग्ध व्यवसायातील खासगीकरणाचे आव्हान रोखण्यासाठी उत्पादकांनी संघावरील विश्वास कायम ठेवत नियमित दूध पुरवठा केला पाहिजे. कार्यकारी संचालक प्रतापराव उबाळे यांनी अहवालवाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव मुळे यांनी केले.