आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कामकाज दुस-या दिवशीही ठप्पच; महसूल कर्मचा-यांचा संप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महसूल कर्मचा-यांच्या संपामुळे शनिवारी दुस-या दिवशीही शासकीय कार्यालयामधील कामकाज ठप्प झाले होते. महसूल कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून संप पुकारला आहे. नायब तहसीलदारपदाचा ग्रेड-पे वाढवून द्यावा, महसूल विभागातील लिपिकाचे पदनाम बदलून त्याला महसूल सहायक असे पदनाम द्यावे, महसूल कर्मचा-यांच्या अपत्याला खात्यात नोकरी द्यावी, कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्यात यावा, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पद्दोन्नती द्यावी, अनुकंपा तत्त्वावरील सेवाभरतीची पाच टक्के अट रद्द करावी, महसूल विभागातील हवालदार, नाईक, दप्तरी पदाचे मूळ वेतन लिपिकाप्रमाणे द्यावे, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले रोखावे यासह अन्य मागण्यांसाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, सरचिटणीस ज्ञानेश्वर कांबळे व कोषाध्यक्ष कैलास साळुंके यांच्या नेतृत्वाखाली महसूल कर्मचा-यांनी हा संप सुरू केला आहे. संपात महसूल विभागातील कर्मचारी व पदोन्नती नायब तहसीलदांसह वर्ग-3 व वर्ग-4 चे कर्मचा-यासह 750 महसूल कर्मचारी सहभागी आहेत.
आता संप मागे घेणार नाही
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपावर ठाम आहोत. संपामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने आम्ही दिलगीर आहोत.’’ भाऊसाहेब डमाळे, अध्यक्ष, कर्मचारी संघटना
संपामुळे धावपळ झाली
फेरफारचा दाखला घेण्यासाठी आल्यानंतर संप सुरू असल्याचे समजले. त्यामुळे दाखला न घेताच खाली हाताने परतावे लागले.आता संप मिटल्यानंतरच दाखला मिळेल.’’मनोज सुडके,नागरिक.