आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revolution In Agriculture Issue At Nagar, Divya Marathi

भविष्यात युवक करतील कृषिक्षेत्रात क्रांती : पिचड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कृषिक्षेत्रात शिक्षित युवक मोठ्या प्रमाणात येत असून, ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते भविष्यात मोठी क्रांती केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी सोमवारी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत पिचड बोलत होते. आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, सभापती बाबासाहेब तांबे, कैलास वाकचौरे, बाजीराव खेमनर, बाबासाहेब तांबे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. सु. ल. जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सदानंद जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

पिचड म्हणाले, शासनाने शेतक-यांच्या, सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. पाणी टंचाई, जनावरांच्या छावण्या, गारपीटग्रस्तांना मदत या माध्यमातून 1 हजार 520 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. बदलते हवामान लक्षात घेऊन शेतक-यांनी पीकविमा योजनेचा विचार करण्याची गरज आहे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतक-यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके वेळेवर उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने काळजी घ्यावी. गावनिहाय पिकांचे नियोजन करुन शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करुन खरीप हंगाम यशस्वी करावा.

पाचपुते म्हणाले, नगर जिल्हा परतीच्या मोसमी पावसावर अवलंबून आहे. हवामान बदलामुळे पाऊसमान कमी झाल्यास कोणती काळजी घ्यावी, याबाबत शेतक-यांना योग्य मार्गदर्शन केले जावे. शेतक-यांना मूलभूत सुिवधा, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी अडवणे, जलपुनर्भरण, ठिबक सिंचन या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीस जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अंकुश माने, जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, प्रकल्प संचालक शिवाजी आमले, उपसंचालक संभाजी गायकवाड, कृषी विकास अधिकारी विलास नलगे, उपविभागीय अधिकारी दिलीप देवरे, गोरक्ष लोखंडे, सोपान विखे, सुधाकर बोराळे, तंत्र अधिकारी अशोक संसारे, रामदास बुसुडे आदी या बैठकीस उपस्थित होते.

दीर्घकालीन उपाययोजना
टंचाई स्थिती लक्षात घेता पाण्याची बचत, उत्पादन खर्च कमी करणे, पिकांचे उत्पादन वाढवणे या बाबींवर प्रामुख्याने भर देणे गरजेचे आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अल्पकालीन, तसेच दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. खरीप हंगामाची जिल्हा व कृषी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.’’ अनिल कवडे, जिल्हाधिकारी