आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवणे हत्याकांडातील आरोपींची माहिती देणाऱ्यास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव- हरवणे हत्याकांडाला तीन दिवस उलटले, तरी पोलिसांच्या हाती अजून काहीच लागलेले नाही. आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार चौबे यांनी मंगळवारी विद्यानगरला भेट दिली. 

हरवणे कुटुंबातील चारजणांची गळे चिरुन शनिवारी रात्री हत्या झाली. तीन दिवस उलटूनही तपासात प्रगती झालेली नाही. महानिरीक्षक विजयुकमार चौबे यांनी मंगळवारी घटनास्थळाची पाहणी केली, तसेच नातेवाईक ग्रामस्थांशी चर्चा केली. तपासकामाचा आढावा घेऊन त्यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा उपस्थित होते. 
तीन दिवसांपासून पोलीस पथके तपास करत असून आसपासच्या रहिवाशांकडे विचारपूस केली जात आहे. काही साक्षीदारही तपासण्यात आले. मात्र, काहीच निष्पन्न झाले नाही. आरोपींची माहिती देणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेे असून नाव गुप्त ठेवण्यात येईल. उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे - ९७६६७०३२९६, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिलीप पवार - ९८२३२६६२३३ पोलीस निरीक्षक - सुरेश सपकाळे - ९८२३२९५७७७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

हरवणे कुटुंबाची हत्या थंड डोक्याने नियोजनबध्द करण्यात आली. त्यासाठी वैद्यकीय ज्ञानाचा वापर केला गेल्याची शक्यता पुढे आली आहे. शरीरात झालेल्या जखमांमुळे आत रक्तस्त्राव होऊन चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हृदय मेंदूत जखमा झाल्याने मृत्यू होऊ शकतो. बाहेरील जखमांमुळे मृत्यू होऊच शकत नाही, असे मत चौबे यांनी व्यक्त केले. ही घटना तपासाच्या दृष्टीने किचकट असून तपासाची निश्चित दिशा अद्याप मिळालेली नाही. सर्व बाजूने तपास चालू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख शर्मा यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...