आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलीखुंटावरील तणाव पोलिसांसाठी डोकेदुखी; पुन्हा उफाळली दंगल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तेलीखुंटावर दोन गटांत असलेली धुसफूस वारंवार उफाळून येत आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास या भागात दंगल उसळली. यात काही जण जखमी झाले. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित होता. याप्रकरणी एका गटाने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सुमारे दीडशेहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका गटाने दुसऱ्या गटातील दोघांवर तलवार, लोखंडी पाइप, लाकडी दांडके, गज काठ्यांनी हल्ला केला. पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती समजताच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक तथा सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील पथकांसह घटनास्थळी आले. 

तेलीखुंट परिसरातील स्वस्तिक आयुर्वेदिक औषधालय या दुकानासमोर दंगल उसळली. परिसरातील व्यावसायिकांनी पटपट आपापली दुकाने बंद केली. तेलीखुंट भागात दंगल उसळल्याची वार्ता शहरात पसरली. त्यामुळे अफवांनाही ऊत आला. थोड्या वेळाने तोफखान्याचे पोलिस निरीक्षक नारायण वाखारे सहकाऱ्यांसह तेथे आले. मोबाइल सेवाही काही काळ विस्कळीत झाली होती. परिसरात बाटल्यांचा काचेचा खच पडला होता. 

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले. रात्री उशिरा या परिसरात राहणारे इस्टेट एजंट प्रकाश पांडुरंग सैंदर (६०, तेलीखुंट, राम मंदिरासमोर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या भावाला मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे. या दंगलीत हिराकांत आनंदराव रामदासी (वय ४२) चंद्रकांत पांडुरंग सैंदर (तेलीखुंट) हे दोघे जखमी झाले आहेत. काही नागरिकांनी त्यांना रुग्णवाहिकेतून तत्काळ खासगी रुग्णालयांत दाखल केले. 

पोलिसांनी मव्या ऊर्फ मोहसीन शेख, सलमान शेख ऊर्फ माईकल, सद्दाम शेख, शादाब शेख, शब्बीर शेख, साहेबान जहागीरदार ऊर्फ मेजर, जुनेद शेख, शफी जहागीरदार, जनता मिर्ची कांडपचे आरिफ शेख, विरु शेख (रिक्षावाला), आशा चौकातील बी. बी. शेख, सोहेल शेख, अनवर शेख, राजू तांबटकर, हबीब पत्रावाला, इकबाल भंगारवाला आदी दीडशे जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगल, तसेच आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदवला. 

तणावाचे वातावरण नित्याचे 
तेलीखुंट, कापड बाजार परिसरात अतिक्रमण वाढले आहे. हे कारण पुढे करुन काही संघटनांच्या वतीने पोलिसंाना, महापालिकेला निवेदने देण्यात आली होती. त्यामुळे मनपाच्या वतीने गेल्या आठवड्यात मोहीम राबवून या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र, या ना त्या कारणाने या परिसरातील दोन गटांमध्ये नेहमीच धुसफूस सुरू असते. एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या कारणावरुनही यापूर्वी दोन गटांत दगडफेकीचे प्रकार झाले आहेत, अशी माहिती मिळाली. 

आरोपींची नावे निष्पन्न 
शुक्रवारीरात्री पोलिसांनी तेलीखुंट परिसरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यामध्ये दंगलीचा प्रकार कैद झाला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधाकरिता पथके रवाना केली आहेत. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणाला अटक झालेली नव्हती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरुन काही संशयितांना ताब्यात घेतले. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...