आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Riot News In Marathi, Shrigonda, Divya Marathi, Nagar

पार्किंगवरून श्रीगोंद्यात दंगल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - इमारतीसमोर वाहन उभे का केले? याचा जाब विचारण्यावरून वाद वाढत गेल्याने त्याचे पर्यवसान रविवारी दुपारी दोन गटांतील दंगलीत झाले. यात अनेक जण जखमी झाले. बारामतीमधील एका बड्या असामीने स्थानिक नेत्यांना फोन करून झापल्यानंतर हे प्रकरण तक्रार न देता मिटवण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होता.

श्रीगोंदे शहरातील विजय चौक झेंड्याजवळ लोहार गल्लीत एका इमारतीचे काम सुरू आहे. त्या समोर बारामती येथील काही जणांनी वाहन पार्क केले होते. लग्नासाठी आलेल्या या लोकांमध्ये एका सनदी अधिका-याच्या घरचे लोक होते. जागा मालकाने लोकांना येथे कार पार्किंग करू नका, असे ठणकावले. त्या लोकांना राग अनावर झाल्याने त्यांनी जागा मालकास बेदम मारहाण केली. यात त्याचा खुबा निकामी झाला. ही माहिती समजताच जागा मालक समर्थकांची गर्दी वाढली. त्यांनी या ‘पाहुण्यांना’ प्रसाद देण्यास सुरुवात केली.

इमारतीजवळील लाकडी दंडुके यासाठी वापरण्यात आले. हा प्रकार तासभर सुरू होता. त्यानंतर दोन्ही बाजूंचे लोक श्रीगोंदे पोलिस ठाण्यात पोहोचले. परस्परविरोधी फिर्याद देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
मात्र, बारामतीहून एका बड्या असामीचा स्थानिक
नेत्याला फोन आला. प्रकरण वाढवू नका, मिटवून घ्या, असे त्याने सांगितल्यानंतर स्थानिक नेत्याने फिर्याद न देण्यासाठी जागा मालकाला विनंती केली. याप्रकरणी रविवारी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.