आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीतील पीडितांना मिळाली तुटपुंजी मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर- वक्तनूर को बेनूर बना देता है। थोडेस जख्म को नासूर बना देता है। कोण्या शायराने रचलेल्या या पंक्ती येथील शीख बांधवांच्या भावना चपखलपणे व्यक्त करतात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरच्या दंगलीत मिळालेल्या जखमांवर आताशा कुठे खपल्या आल्यात. मात्र, तब्बल तीन दशकांनंतर नुकसान भरपाईच्या नावाखाली सरकारने तुटपुंजी मदत देऊन या खपल्या काढल्या. या जखमा आता पुन्हा भळभळायला लागल्या आहेत.

३१ आॅक्टोबर १९८४ रोजी उसळलेल्या दंगलीत शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकाणे, गाड्या, ट्रका पेटवण्यात आल्या. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. दोन दिवसांनी दंगल शांत झाली. मात्र, त्या आगीच्या झळा आजही शीख समाजाला छळत आहेत.
दंगलीनंतर प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तर दूर, साधी तक्रारही घेण्यास पोलिस तयार नव्हते. अखेर नोहेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. तोही नावालाच. कारण त्याचा ना तपास झाला, ना आरोपींना अटक. तत्कालीन सरकारने दंगलीतील नुकसानीच्या दहापट रक्कम देण्याचा अध्यादेश काढला. प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी तीन दशके गेली. येथील गुरुद्वारामध्ये तहसीलदार किशोर कदम यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वाटले गेले. प्रत्यक्षात ते कोटींचे नुकसान झाले.मिळालेली मदत अवघी ३५ लाख. दंगलीतील कटू आठवणी विसरण्याचा प्रयत्नात असणाऱ्या या बांधवांना पुन्हा तशाच अनुभवास सामोरे जावे लागले. दंगलप्रकरणी नोव्हेंबरला फिर्याद दाखल करून घेण्यात आली. मात्र, कुणालाही अटक करण्यात आली. दंगलीनंतर नानावटी आयोगासमोर येथील व्यापाऱ्यांनी नुकसानीबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले. नुकसानग्रस्तांना दहापट भरपाई देण्याची शिफारस सरकारने त्यावेळी केली. परंतु आज इतक्या वर्षांनंतर मिळालेली ही मदत तुटपुंजी ठरली आहे.