आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - दोन मोटारसायकलींची धडक होऊन एक युवक ठार झाला, तर दोन महिला जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पारनेर-कान्हूरपठार मार्गावरील सोबलेवाडी परिसरात झाला. किसन सीताराम शेळके (25, सोबलेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
पल्सर मोटारसायकलीवरून किसन शेळके हा आपल्या आईला घेऊन शनिवारी पारनेरहून सोबलेवाडीकडे जात होता. समोरून येणार्या मोटारसायकलीची त्याच्या मोटारसायकलीला धडक बसली. रस्त्यावर जोरात पडल्याने किसनच्या डोक्याला मार लागला. त्याला सुपा येथील रुग्णालयात हलवण्यात आले, पण तेथे त्याचा मृत्यू झाला. त्याची आई हारुबाई (60) व समोरून चाललेल्या रंजाबाई भाऊ सोबले (34) या जखमी झाल्या.
माजी सरपंच बाळासाहेब शेरकर, विलास सोबले, पारनेरचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले, उपनिरीक्षक जगदीश मुलगीर यांनी घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी सुपा येथील रुग्णालयात हलवले. दरम्यान, दुसरा मोटारसायकलस्वार मात्र अपघातानंतर वाहनासह पळून गेला. याप्रकरणी शनिवारी रात्री पोलिसांत फरार मोटारसायकलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.