आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गांधीगिरी: अहमदनगरातील रस्त्यावरील खड्डय़ांवर रंगली ‘ऑलिम्पिक स्पर्धा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडण्यास जबाबदार असलेल्या महापालिकेचा निषेध करण्यासाठी लोकजागर फाउंडेशनतर्फे मंगळवारी कुष्ठधाम रस्त्यावरील सर्मथ प्रशाळेजवळ ‘ऑलिम्पिक स्पर्धा’ भरवण्यात आली!

यावेळी महिलांसह लहान मुलांनी खड्डयांवरून उड्या मारून महापालिकेचा निषेध नोंदवला. लोकजागरच्या कार्याध्यक्ष आशा साठे, हिरा खताळ, स्मिता कुलकर्णी, स्वाती घुले, शशिकला एखे, दीपाली माळी, वंदना लालवाणी, अनया तांबोळी आदी यावेळी उपस्थित होत्या. साठे म्हणाल्या, मनपाला विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. जनतेकडूनही कर वसूल केला जातो. तरीही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्डयांमुळे नागरिकांना मणक्यांचे आजार जडले आहेत, तसेच वाहनांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे मनपाने तातडीने सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत.