आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकाश्रम रस्त्यावरील सर्व पुलांची कामे तातडीने पूर्ण करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बालिकाश्रम रस्त्यावरील सर्व पुलांची कामे तातडीने पूर्ण करा, अशी सूचना महापौर शीला शिंदे यांनी ठेकेदार व अधिकार्‍यांना केली.

आमदार अनिल राठोड, नगरसेवक संभाजी कदम, संजय शेंडगे, शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, ठेकेदार अभय मुथा, राजेश लयचेट्टी, राहुल चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते. बालिकाश्रम रस्त्याचे रुंदीकरणासह काँक्रिटीकरण, पूल, गटार, फूटपाथ आदी कामे सध्या सुरू आहेत. सिद्धार्थनगर, चिंतामणी हॉस्पिटल व वाकळे वस्ती येथील तीन पुलांचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

रस्त्याच्या इतर कामात किरकोळ अडचणी येत असल्याची माहिती शहर अभियंता कुलकर्णी यांनी दिली. गटार खोदाईच्या कामात दूरसंचारची केबल आडवी येत असून त्यासाठी या विभागाशी संपर्क केला, परंतु त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. याबाबत महापौर म्हणाल्या, दूरसंचार ही लोकांना सेवा देणारी संस्था आहे. या विभागाला लेखी पत्र देऊन तातडीने केबल हटवण्याबाबत कळवावे, तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी पुलाची कामे तातडीने पूर्ण करावीत, त्यासाठी कामगारांची संख्या वाढवा, अशा सूचना त्यांनी ठेकेदार व संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.