आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे : चंद्र, मंगळ आणि नगर शहरातले...!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम ४८४ नुसार नगरसेवक, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक म्हणून काम करणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या पाहता महापालिकेतील या सेवकांनी जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासला आहे. खड्डे, डागडुजी, पुन्हा खड्डा असे चक्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांची संख्या कमी झालेली नाही. दुसरीकडे प्रत्येक वर्षी रस्त्यांच्या डागडुजीच्या (पॅचिंग) नावावर लाखो रुपयांची उधळपट्टी महापालिकेकडून सुरू आहे.
खड्ड्यांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दर्जेदार रस्त्यांच्या सुविधेबरोबरच शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, सध्या शहरात उलटी स्थिती आहे. दलि्ली दरवाजा ते पत्रकार चौक, नेप्तीनाका ते आयुर्वेद महाविद्यालय, लालटाकी ते सर्जेपुरा चौक, प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग नाका या प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांचाही बोजवारा उडाला आहे. उपनगरांतील काही रस्त्यांवर, तर गेल्या दहा वर्षांत डांबर व खडी पडलेली नाही. पावसामुळे सध्या या रस्त्यांवर गुडघाभर खोल खड्डे तयार झाले आहेत. काही ठिकाणी वाहनचालकांवर अक्षरश: रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. अनेकांना अपघातालाही सामोरे जावे लागले आहे.
बालिकाश्रम रस्त्याच्या अर्धवट कामामुळे चार दविसांपूर्वीच एका व्यक्तीला गंभीर अपघात झाला. काही नागरिक तर या जीवघेण्या खड्ड्यांमुळे घराबाहेरही पडत नाहीत. विशेष म्हणजे महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी (पॅचिंग) मागील पाच वर्षांत तब्बल एक कोटीपेक्षा अधिक खर्च केला आहे. मात्र, हा खर्च केवळ कागदोपत्रीच आहे. एकदा खड्डा बुजवला की, महिनाभरात त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा तयार होतो. तांत्रिक पध्दतीने खड्डा न भरता त्यात खडी व सिमेंटऐवजी चक्क माती, विटांचे तुकडे, तसेच केरकचरा टाकण्यात येतो. त्यामुळे पॅचिंगच्या ठिकाणी पुन्हा खड्डा तयार होतो. गेल्या पाच वर्षांपासून हे चक्र असेच सुरू आहे.
केडगाव उपनगरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बहुचर्चित हविरेबाजार ते केडगाव रस्त्याचे कामही अजून अर्धवट असल्याने नागरिकांच्या हालअपेष्ठांत भर पडली आहे. उपमहापौर सुवर्णा कोतकर राहात असलेल्या कोतकरनगरमधील रस्त्यांचीही अनेक वर्षांत डागडुजी झालेली नाही.
पदाधिकारी-नगरसेवक नावालाच
महापालिकेत सध्या जनतेने निवडून दलिेले ६८, तर ५ स्वीकृत असे ७३ नगरसेवक आहेत. या सर्वांच्या दिमतीला ३० ते ३५ अधिकाऱ्यांसह सुमारे २३०० कर्मचारी आहेत, तरीदेखील सुवधिांचा बोजवारा उडाला आहे. रस्ते हा नगरकरांच्या जवि्हाळ्याचा प्रश्न आहे, परंतु खड्ड्यांची सध्याची संख्या पाहता नगरकरांच्या सहनशीलतेचा अंदाज येतो. खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांची तरतूद करूनही खड्ड्यांची संख्या "जैसे थे' आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा बारा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, परंतु नेहमीप्रमाणे जनतेचे हे पैसेदेखील पाण्यात जाणार असल्याचे जाणकार सांगतात.

पावसामुळे अडचण
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी दहा-बारा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, पावसामुळे काम सुरू करण्यास अडचणी येत आहेत. पाऊस थांबताच प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.''
नंदकुमार मगर, शहर अिभयंता, महापालिका.

हे आहेत खड्ड्यांचे प्रमुख रस्ते
{पत्रकार चौक ते दलि्ली दरवाजा
{प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग
{नेप्तीनाका ते आयुर्वेद महाविद्यालय
{अप्पू हत्ती चौक ते सर्जेपुरा
{सर्जेपुरा ते कोठला स्थानक
{आडते बाजार ते मंगलगेट
{सराफ बाजार ते रामचंद्र खुंट
{कोठला स्थानक ते चांदणी चौक
{तेलीखुंट ते पॉवर हाऊस
{दलि्ली दरवाजा ते नवरंग व्यायामशाळा

हे आजार होतात...
{रस्त्यावरील अती खड्ड्यांमुळे मणक्यांचा त्रास
{कंबरेची गादी सरकून कंबरदुखी वाढते
{माकडहाड खाली-वर सरकल्यास पाठदुखी
{दणक्यांमुळे हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता
{वृध्द व्यक्तींना पाठदुखीचा त्रास अधिक वाढतो

वाहनांचे नुकसान
}टायर, ट्यूब खराब (दुरुस्ती खर्च ४०० ते ५००),
}हँडेल बॉलसेट (दुरुस्ती नाही)
}सस्पेन्शन (दुरुस्ती-५०० ते ६००)
}चाकाचे बेअरिंग (दुरुस्ती नाही)
}चिमटा आऊट (दुरुस्ती-३०० ते ४००) }शॉकअ‍ॅबसॉर्बर्स दुरस्ती (४०० ते ५००)

मलमपट्टी नको
खड्ड्यांचा त्रास आम्ही अनेक वर्षांपासून सहन करत आहाेत. आधीच अरुंद रस्ते, त्यात खड्डे, त्यामुळे मोठी कसरत करावी लागते. तात्पुरती डागडुजी केल्याने आठ िदवसांत खड्डे पुन्हा जैसे थे होतात. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.''
सायली येनगूल, युवती.