आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरूर कोल्हार रस्ता चांगले करण्याचे आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरातून जाणारे सर्व ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावरच्या रस्त्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर पुन्हा आंदोलन करण्यात आले. या रस्त्यांची दुर्दशा दूर करण्याचे पुन्हा एकदा लेखी आश्वासन देण्याची नामुष्की अधीक्षक अभियंता पी. बी. भोसले यांच्यावर आली. नगर-कोल्हार रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम लगेच सुरू होणार आहे. नगर-शिरूर रस्त्यावर नूतनीकरणाचा थर देण्याची काम शुक्रवारपासून सुरू होणार आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. या आधीही त्यांनी या विषयावर अधीक्षक अभियंत्यांना काळे फासण्याचा इशारा देऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी अधिक्षक अभियंते भोसले यांनी त्यांना लेखी आश्वासन दिले होते. परंतु काम झाले नाही. उलट या बीओटी ठेकेदारांनी सात ऑक्टोबरपर्यंत रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम केल्यास त्यांचा टोल स्थगित करण्याचे पत्र २९ सप्टेंबरला नाशिकच्या मुख्य अभियंत्यांनी अधीक्षक अभियंता भोसले यांना दिले होते. त्यावर त्यांनी काहीच कारवाई केली नाही. राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर मात्र त्यांनी या रस्त्यांची कामे तातडीने सुरू होतील, असे लेखी आश्वासन खोसे यांना दिले.

रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली असताना ठेकेदारांवर कारवाई झाल्याने ठेकेदार सार्वजनिक बांधकामचे हितसंबंध असल्याचा आरोप खोसे यांनी केला. कोल्हार रस्त्यावरील टोलनाका तातडीने बंद करावा; अन्यथा सात दिवसांत बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यावर भोसले यांनी तातडीने निर्णय घेत कार्यकारी अभियंत्यांची बैठक घेऊन काम तातडीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. खोसे यांना दिलेल्या लेखी आश्वासनात कार्यकारी अभियंता जी. बी. विभुते यांनी नगर-कोल्हार रस्त्याच्या ठेकेदाराने १५ दिवसांत काम पूर्ण केले नाही, तर त्यांचा टोल स्थगित करण्याचा इशाराही दिला आहे. खोसे यांनी नगर-शिरूर रस्त्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले. या सक्कर चौक ते पोलिस अधीक्षक चौक दरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचेही काम शुक्रवारपासूनच सुरू होणार असल्याचे लेखी आश्वासन भोसले यांनी स्वतंत्रपणे दिले आहे.

मुख्य अभियंत्यांचा आदेश धाब्यावर
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी भोसले यांना, आवश्यक कामे करणाऱ्या बीओटी ठेकेदारांचे टोल बंद करण्याचे आदेश २९ सप्टेंबर रोजी दिले होते. मात्र, त्यानंतर गेल्या २१ दिवसांत भोसले यांनी काहीच कारवाई केली नाही. शेवटी आंदोलनामुळे त्यांना कारवाई करण्यास भाग पडले.
बातम्या आणखी आहेत...