आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावशीच्या घरी जबरी चोरी करणारा जेरबंद, कारेगाव एमआयडीसीमध्ये आरोपींना पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वैयक्तिक व्यावसायिक द्वेषातून मावशीच्या घरात जबरी चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला. राजू बुगे (बुगेवाडी, ता. पारनेर) असे त्याचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील कारेगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या साथीदारांना पारनेर तालुक्यात पकडण्यात आले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संजयकुमार सोने, हेड कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, योगेश गोसावी, पोलिस नाईक दत्ता हिंगडे, उमेश खेडकर, अण्णा पवार, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, काॅन्स्टेबल योगेश सातपुते, सचिन कोळेकर यांना आरोपीची माहिती मिळाली होती.

गुन्हे शाखेकडून तपास
पारनेरतालुक्यातील कानेर ओहळ येथील जबरी चोरी करणारा आरोपी राजू बुगे हा कारेगाव येथील एमआयडीसी परिसरात होता. पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहिती काढून त्याच्या साथीदारांना सुपा, पिंपरी जलसेन, येवती पाडळी अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. प्रशांत सुभाष करंजुले, अमोल भाऊसाहेब उबाळे, दत्ता फक्कड करंजुले अशी इतर आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेने त्यांना पकडून अधिक तपासाकरिता पारनेर पोलिसांच्या ताब्याच दिले आहे.

चोरीची कबुली
आरोपींकडेअधिक चौकशी केली असता मुख्य आरोपीने त्याच्या सख्खा मावशीबद्दल असलेल्या द्वेषापोटी १५ जुलैला कानेर ओहळ येथे तीन मित्रांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून मारहाण करून गळ्यातील गंठण, कानातील सोन्याचे दागिने मोबाइल असा ऐवज बळजबरीने चोरून नेल्याची कबुली दिली. याप्रकरणी पारनेर पोलिस स्टेशनला जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद आहे. गुन्ह्यात गेलेला माल सोन्याचे दागिने, मोबाइल गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...