आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेशातील शनिभक्तांना लुबाडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- हिमाचल प्रदेशातील शनिभक्तांना राहात्याचा जीपचालक व अन्य तिघांनी शनिवारी (19 जानेवारी) रात्री आठच्या सुमारास बेल्हेकरवाडी शिवारात लुबाडले. शस्त्राचा धाक दाखवून पावणेचार लाखांचा ऐवज त्यांनी लांबवला.

सुरेश बन्सीलाल शर्मा (मालरोड, मालान, हिमाचल प्रदेश) हे कुटुंबीयांसह शिर्डी व शनिशिंगणापूरला देवदर्शनासाठी आले होते. जीपने (एमएच 15 बीएन 5523) ते शनिशिंगणापूरला आले होते. बेल्हेकरवाडीतील देवीचे दर्शन घेऊन शिर्डीला परतताना चालक शकील इब्राहिम शेख (राहाता) याने जीप पाटाच्या कडेने घेतली. पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून शर्मा कुटुंबीयांना मारहाण करून सोन्याचे दागिने, रोकड व मोबाइल असा पावणेचार लाखांचा ऐवज लांबवला.