आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूटमार करणारे आरोपी, पाेलिसांमध्ये चकमक; नगर जिल्ह्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
शिर्डी- श्रीरामपूर- बाभळेश्वर- लोणी रस्त्यावर रविवारी मध्यरात्री टेम्पो चालकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा लोणी पोलिसांशी सिनेस्टाइल सामना झाला. दरोडेखोरांनी गाेळीबार केल्यानंतर पाेलिसांनीही त्यांना उत्तर दिले. दोन- तीन तासांच्या चकमकीनंतर अखेर चार दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले, तर दोन जण फरार झाले. सर्व आरोपी श्रीरामपूर परिसरातील असून चकमकीत जखमी झालेल्या दोन आरोपींवर उपचार सुरू आहेत. श्रीरामपूर व लोणी पोलिसांत आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

रविवारी पहाटे तीनच्या सुमारास लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक गलांडे यांना लोणी- बाभळेश्वर रस्त्यावर वाहनांना लुटण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस तसेच राजुरी, ममदापूर ग्रामस्थांच्या मदतीने नाकेबंदी केली. या रस्त्यावर आयशर टेम्पो व छोटा हत्ती  अडवून चालकांना कत्तीने मारहाण केल्याचा व त्यांच्याकडून एटीएम कार्ड, रोख रक्कम, मोबाइल काढून घेतल्याची घटना घडली होती. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत असताना आरोपीने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. दुचाकी अंगावर घालून एका पोलिस कर्मचाऱ्याला जखमी केले. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी फायरिंग केले. चार आरोपी पळून जात असताना पाेलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी सोडून ते शेतात पळाले. 

दाेन अाराेपी फरार  
तौफिक सत्तार शेख (वय ३१, रा. श्रीरामपूर),  राहुल विलास शेंडगे (१९, रा. अशोकनगर) या अाराेपींना पकडण्यात पाेलिसांना यश अाले. त्यांच्याकडून  मिळालेल्या माहितीवरून गौरव रवींद्र बागूल व किरण सुरेश काकफळे (दोघेही रा. श्रीरामपूर) यांनाही अटक करण्यात अाली. इतर दाेघांना पकडण्यासाठी पाेलिस पथक रवाना झाले अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...