आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अळकुटी येथे दरोडा; महिलेस बेदम मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे रविवारी (30 जून) मध्यरात्री अडीचच्या सुमारास दरोडा पडला. विरोध करणार्‍या महिलेला दरोडेखोरांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. मारहाणीत एक वृध्दाही जखमी झाली. दरोडेखोरांनी 1 लाख 35 हजारांचा ऐवज लांबवला़

अळकुटी येथील पुंडे आळीत राहणार्‍या धोंडिभाऊ पुंडे यांच्या घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी घराची कडी बाहेरून लावून शेजारच्या बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ घरात त्यांनी उचकापाचक सुरू केली. त्या आवाजाने जाग्या झालेल्या चैताली भालचंद्र पुंडे (27) यांनी त्यांना विरोध केला असता त्यांच्या कपाळावर धारदार कोयत्याने वार करण्यात आला़ त्यांच्या गळयातील गंठण दरोडेखोरांनी ओरबाडले. लक्ष्मीबाई सखाराम पुंडे (55) यांच्या गळयातील गंठणही त्यांनी घेतल़े पेटीत ठेवलेल्या डाळिंबविक्रीच्या पैशांसह दागिने, जमीन खरेदीची कागदपत्रे व मोबाइल असा एकूण 1 लाख 35 हजार 200 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला.