आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरभंगा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची लूटमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पुणे-दरभंगा एक्स्प्रेसमध्ये बेलवंडी ते विसापूरदरम्यान लूटमारीची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. तृतीयपंथियांनी दाखवलेल्या धाडसामुळे लूटमार करणार्‍या एकाला अटक करण्यात यश आले. सतीश भास्कर गाडेकर (नांदूर, ता. येवला, जि. नाशिक) असे त्याचे नाव असून त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. सर्वसाधारण डब्यात बसलेल्या प्रवाशांना धाक दाखवून चोरट्यांनी नऊ हजार रूपये लुबाडले.

तृतीयपंथियांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्यातील एकाला गाडीबाहेर फेकण्यात आले. मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले. अन्य तृतीयपंथियांनी एका चोराला पकडून ठेवले. रेल्वे पोलिसांनी गाडेकर व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून मनमाड येथील रेल्वे न्यायालयाने गाडेकरला 8 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली.