आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवगडच्या कमानीवरील अकरा कळसांची चोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे- नगर-औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाटा येथील श्रीदत्त देवस्थानच्या स्वागत कमानीवरील सुमारे 24 हजार 500 रुपये किमतीचे अकरा पितळी कळस चोरीला गेले. हा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला.

नगर-औरंगाबाद रस्त्यापासून सहा किलोमीटर अंतरावर श्रीदत्त देवस्थान आहे. देवस्थानने पाच वर्षांपूर्वी महामार्गावर तिहेरी स्वागत कमान उभारली. ही कमान दाक्षिणात्य शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून त्यावर गोपूर पद्धतीचे अकरा लहान मोठे पितळी कळस उभारण्यात आले होते. मंगळवारी पहाटे हे कळस चोरीला गेले. यामध्ये साडेतीन फूट उंचीचे तीन कळस, दोन व एक फूट उंचीचे प्रत्येकी चार कळसांचा समावेश आहे. हे कळस सुमारे चाळीस ते पन्नास फूट उंचीवर होते.

कळस चोरीला गेल्याचे दुपारी बाराच्या सुमारास मंदिराचे सफाई कर्मचारी रामभाऊ गोर्डे यांच्या लक्षात आले. त्यांनी ही घटना देवस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांना सांगितली. याप्रकरणी देवस्थानचे कर्मचारी राजेंद्र गिते यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक संदेश चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल एस. डी. भोईटे करीत आहेत.

भाविकांनी संयम राखावा..
पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना अटक करावी. देवस्थानच्या भक्तांनी या घटनेचा निषेध करताना भावनेच्या आहारी न जाता शांतता राखावी.’’ भास्करगिरी महाराज, श्रीदत्त देवगड देवस्थान.