आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर दिवसा भवानीनगरात ७२ हजारांची घरफोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मार्केट यार्ड परिसरातील भवानीनगरमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी सकाळी उजेडात आली. याप्रकरणी हर्षद मुळचंद गुगळे यांनी कोतवाली पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुगळे हे भवानीनगरमधील स्वस्तिक रेसिडेन्सीमध्ये राहतात. शुक्रवारी सकाळी दहा वाजता ते घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. नंतर घरातील सामानाची उचकापाचक करून बेडरुममध्ये कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

दुपारी ३ वाजता गुगळे घरी परतले असता त्यांना कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्वरित कोतवाली पोलिसांना पाचारण केले. याप्रकरणी हर्षद यांचे बंधू अनिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे.