आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उक्कलगावच्या बँकेत दरोडा, आठ लाख रुपयांची रोकड लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - तालुक्यातील उक्कलगाव येथील जिल्हा सहकारी बँकेची शाखा बुधवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी फोडली. गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी तोडून सुमारे सव्वाआठ लाख रुपयांची रोकड लंपास केली. गुन्हेगारांच्या शोधासाठी पाेलिसांची पथके रवाना झाली आहेत.

उक्कलगाव येथील सेवा संस्थेच्या कार्यालयात बँकेची शाखा मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी बँकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गॅस कटरच्या साह्याने शाखेतील तिजोरी फोडली. आतील आठ लाख ३८ हजार २५६ रुपयांची रोकड चोरून नेली. गॅस सिलींडर मात्र चोरट्यांनी तसेच सोडले. बँकेचे व्यवस्थापक एन. एस. रेवाळे दिंडीत गेले आहेत. त्यांच्या मोबाइलवर बँकेच्या घटनेसंदर्भात संदेश आल्याचे त्यांनी पहाटे पाचच्या सुमारास पाहिले. त्यांनी तालुका अधिकारी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक प्रताप बावीस्कर, निरीक्षक दिलीप पवार, किशोरसिंग परदेशी, राहुरीचे निरीक्षक शिंदे, उपनिरिक्षक रितेश राऊत, बेलापूर पोलिस चौकीतील हवालदार रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, दीपक जाधव हे घटनास्थळी पोहोचले. गुरुवारी सकाळी ठसे तज्ज्ञ श्वानपथकास बाेलावले.
घटनेची माहिती मिळताच बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, संचालक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. प्रभारी शाखाधिकारी गुरुलाल लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला.
बातम्या आणखी आहेत...