आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोडे खूनप्रकरण उलगडणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- विनायकनगर परिसरातील समतानगर कॉलनीत राहणाऱ्या मीनाक्षी प्रकाश गुलाब रोडे या दाम्पत्याच्या खूनप्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला पेालिसांनी गजाआड केले आहे.

लखन ऊर्फ ढोल्या नारायण भोसले (१८, आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. त्याला १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळालेली आहे, तर याच गुन्ह्यात ढोल्याचा साथीदार असलेला दुसरा आरोपी मात्र काही आठवड्यांपूर्वी अळकुटी येथे ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत ठार झाला असल्याची माहिती कोतवाली पोलिसांनी दिली आहे. रोडे यांचा खून झाल्यानंतर चोरीला गेलेली मोटारसायकल ढोल्या भोसलेकडे मिळाली आहे. त्यामुळे पोलिस त्याच्याकडे या खुनाबाबत चौकशी करीत आहेत. ढोल्याच्या अटकेमुळे या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.