आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणलोटावर पाच वर्षांत 25 हजार कोटींचा खर्च

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकार मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करत असून महाराष्ट्राला सर्वाधिक निधी प्राप्त होत आहे. पाणलोट क्षेत्र विकासावर पाच वर्षांत 25 हजार कोटींचा खर्च झाला आहे, अशी माहिती जलसंधारण व रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव व्ही.गिरीराज यांनी दिली.

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स व पद्र्मशी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पाणलोट क्षेत्र विकासातील नवीन प्रगती या विषयांवरील चर्चासत्रात ते बोलत होते. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष के. एम. राजे, विखे फाउंडेशनचे महासचिव डॉ. बी. सदानंद, डॉ. अतुल अत्रे, राजकुमार मुनोत, डॉ. पी. एम. गायकवाड, प्राचार्य डॉ. एच. एन. कुदळ, प्रा. जी. बी. बंगाळ, प्रकाश गांधी, प्रा. व्ही. एन. बारई, एम. त्रिकांडे, भारत भागवत, एच. बी. थिगळे, प्रा. दीपक विधाते आदी यावेळी उपस्थित होते. गिरीराज म्हणाले, पाणलोट क्षेत्र विकासात खासगी व अशासकीय स्वयंसेवी संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

याबाबतच्या यशोगाथा पुढे येत असल्याने अन्य संस्थांनाही प्रेरणा मिळत आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे पाणलोट क्षेत्र विकासाचे काम पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. याबाबतची धोरणे गाव पातळीवर निश्चित करून दिल्यास हिवरेबाजार सारखा विकास इतरत्रही शक्य होईल, असेही ते म्हणाले.