आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनव उपक्रम: ‘रोल-स्लाइडर’ गोल्डन बुकमध्ये!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ‘कलरी समिट’ या संकल्पनेवर आधारित व ‘बोलस-आउटर’ या रंगआकार संगतीत चितारलेले बोधचिन्ह अन् त्याचबरोबर ‘चला सर्मथ होऊ या’ या सर्मथ नागरिक घडवण्याच्या दृष्टीने बेतलेले बोधवाक्य व ‘रोल-स्लाइडर’ या उद्घाटनाच्या अनोख्या संकल्पनेने लंडनच्या गोल्डन बुक आणि त्रिची (केरळ) येथील ‘मिरॅकल रिसर्च फाउंडेशन’च्या उद्घाटनांमध्ये स्थान मिळवले.
सावेडीतील सर्मथ प्रशालेच्या माध्यमिक विभागाचे यावर्षीचे स्नेहसंमेलन अनेकविध वैशिष्ट्यांमुळे रंगतदार ठरले. ‘रोल-स्लाइडर’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे शिक्षक अमोल बागूल यांनी सांगितले की, मंडप ते स्टेज अशा हव्या तेवढय़ा दोर्‍या बांधून त्याला चिनीमातीच्या कुंड्या वापरून कुंड्यांना पुष्पहार, ‘जय जय रघुवीर सर्मथ, चला सर्मथ होऊ या’, असे शब्द थर्माकॉलमध्ये बनवून हँगरच्या साह्याने अडकवली. उद्घाटनाच्या वेळी या कुंड्या दोरीच्या साह्याने संगीताच्या तालावर ओढून व्यासपीठापर्यंत आणल्या. सर्मथ रामदासांच्या प्रतिमेला पुष्पहार व मनाच्या श्लोकाच्या पुस्तकांची माळ, सर्मथ स्थापित अकरा मारुतीच्या छायाचित्रांची माळ आदी भक्तिगीते, संगीताच्या तालावर पाहुण्यांनी दोरी ओढताना मुलांचा उत्साह अपूर्व होता.
बागूल यांनी सजावटीतून साकारलेले प्रशालेच्या आवारातील सर्मथालय सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. स्नेहसंमेलनाच्या आठ दिवस आधीच मनोरंजक फलक लेखनातून काउंटडाऊन दर्शवण्याचा उपक्रमही कौतुकास्पद ठरला. ‘पोटभर खा, पण उष्टे टाकू नका’ संदेश देणारे स्नेहभोजनाचे फलक, 50 व्यंगचित्रांची काटरूनची, प्रशालेच्या छतापासून खाली सोडलेली वार्‍यावर विहरणारी माळ, सलग तीन दिवस तीन प्रकारे सजावट केलेले सर्मथ व्यासपीठ, विद्यार्थ्यांनी वर्षभरात मिळवलेल्या पारितोषिकांचे प्रदर्शन, गरम हवेच्या साह्याने वर जाणारे कागदी रंगीत दिवे, वर्षभराच्या प्रगतीचा आढावा घेणारी छायाचित्रे, वृत्तांच्या सजावटीने सजलेले प्राचार्यांचे दालन आदी प्रदर्शनीय घटक गौरवास्पद ठरले. यासाठी बागूल यांना र्शीसर्मथ विद्या प्रसारक मंडळ, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे पाठबळ लाभले.
157 विद्यार्थ्यांचा सहभाग
दैनिक भास्कर या राष्ट्रीय माध्यम समूहातर्फे आयोजित ब्रेन हंट-1, ज्युनियर एडिटर- 1 व 2 या तीनही जागतिक विश्वविक्रमी उपक्रमांत सर्मथ प्रशालेच्या 157 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या उपक्रमाच्या फलकाचे उद्घाटन प्रधान जिल्हा न्यायाधीश जयंत कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
उपक्रम स्तुत्य
बागूल यांनी या उपक्रमासाठी बरेच प्रयत्न केले. त्यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. त्यांच्यामुळे यावर्षीचे स्नेहसंमेलन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्याची बागूल यांची पद्धत स्तुत्य आहे.
- डी. आर. कुलकर्णी, अध्यक्ष, सर्मथ विद्या प्रसारक मंडळ.