आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ कॅम्पमध्ये परवान्यासाठी गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - वाहन चालवताना परवाना बंधनकारक असल्याने, तसेच विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आल्याने परवाना (लायसन्स) काढण्यासाठी तरुणांसह पन्नाशी गाठलेल्यांनी आरटीओ कॅम्पकडे धाव घेतली आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजारतळावर झालेल्या वाहन परवाना ट्रायलसाठी वाहनधारकांनी रांगा लावल्या होत्या.

वाहनपरवाना दुचाकी-चारचाकी वाहनधारकांना असणे कायद्याने बंधन कारक असले, तरी आजवर चारचाकी वाहनचालक केवळ लायसन्स काढून घेत होते. मात्र, दिवसेंदिवस वाढते अपघात, तसेच कायद्याच्या कडक अंमलबजावणीमुळे मोटारसायकलस्वारांना परवाना असणे गरजेचे वाटू लागले अाहे. तरुणांसह उतरवयात असलेल्या अनेकजण वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओ कॅम्पमध्ये जाऊन परवाना काढण्याचा प्रयत्न करत आहेत. विनापरवाना मोटारसायकलस्वारांवर अनेक ठिकाणी कारवाई होत असल्याने वाहनधारकांची भंबेरी उडत आहे. चारचाकी वाहनांच्या तुलनेत मोटारसायकलींची संख्या तीन ते चारपट असल्याचे दिसून आले.
वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी आरटीओ कॅम्पमध्ये सोमवारी ट्रायलसाठी मोटारसायकलस्वारांची लागलेली रांग.