आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओचा कारभार पाण्यात, टेस्ट ड्राईव्ह होताच वाहनांचे पासिंग...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उपप्रादेशिक परिवहन विभागाचे एक कार्यालय शहरात तर दुसरे शहराच्या बाहेर आहे. दोन्हीही कार्यालयांची अवस्था अतिशय बिकट असल्यामुळे कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन्ही कार्यालये सध्या पाण्यात असल्यामुळे येथे येणाऱ्यांना वाट काढून यावे लागत आहे.
अकोला आरटीओ कार्यालयाची हक्काची जागा नाही. त्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका वर्षात अनेक इमारती बदलल्या आहेत. सध्या रेल्वे स्थानकासमोर असलेल्या महापालिकेच्या एका शाळेमध्ये आरटीओ कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. या ठिकाणी वाहनधारकांसाठी कोणत्याही मुलभूत सोयी नाहीत. खिडक्यांच्या बाहेर पाणीच पाणी साचले आहे. तर माहिती देणारे फलकही या ठिकाणी नाहीत. त्यामुळे वाहनधारक गोंधळून जात असल्यामुळे ते एजंटच्या जाळ्यात अडकत असून, त्यांच्याकडूनच काम करून घेतलेले बरे म्हणून त्यांच्याकडे काम देऊन निघून जात आहेत. हे एजंटच्या पथ्थ्यावर पडत आहे. तर खडकी येथे वाहनांचे पासिंग होत असल्यामुळे येथे तर सध्या चिखलाचे साम्राज्य असल्यामुळे येथे वाहन चालवून दाखवणे तर दूरच सर्वच कामे कागदोपत्री एजंटाकरवी होत आहेत. येथेही एजंटचा बोलबाला सुरु असल्याचे दिसून येत आहे.

चिखलात वाहनांचे पासिंग होतेच कसे :
खडकीयेथील वाहनांच्या पासिंगचे कार्यालय मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर आत आहे. या संपूर्ण रस्यावर सध्या चिखल आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालवणे मुश्किल आहे. अशाही परिस्थितीत वाहनांचे पासिंग दररोज सुरू आहे.

एजंटचा बोलबाला
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दोन्ही कार्यालयात एजंटचा बोलबाला आहे. या कार्यालयात एजंटच्या हाती फाईल्स दिसून येतात. त्यांच्या फाईली या अगोदर निकाली निघतात नंतरच प्रत्येक्ष आलेल्या वाहनधारकांच्या फाईलीवर विचार होत असल्याचे वास्तव आहे.
बातम्या आणखी आहेत...