आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुबल अग्रवाल नगरच्या जिल्हाधिकारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांची शुक्रवारी नगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. मावळते जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या नव्या नियुक्तीबाबत अजून निर्णय झालेला नाही.

नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अग्रवाल यांची 3 मार्च 2011 रोजी नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यकाळात बनावट अपंग प्रकरण, 72 लाखांचा टँकर घोटाळा, केडगाव शाळाखोली दुरुस्ती घोटाळा, रोजगार हमी योजना घोटाळा, पुस्तक खरेदी घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्या वादग्रस्त ठरल्या. पण संयमाने सर्वच घोटाळा बहाद्दरांची चौकशी सुरू करून कारवाईचे धाडसी निर्णय अग्रवाल यांनी घेतले. त्यांनी ई-लर्निंग, लोकसहभागातून संगणकीकरण आदी उपक्रम यशस्वीपणे राबवले.


शैलेश नवाल यांची जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर अग्रवाल यांची कोठे बदली होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नियुक्तीचे ठिकाण जाहीर न झाल्याने त्या प्रतीक्षा यादीत होत्या. शासनाने शुक्रवारी त्यांची नियुक्ती नगरच्याच जिल्हाधिकारीपदी केली. मावळते जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या नियुक्तीचे ठिकाण अद्याप जाहीर झालेले नाही.

सर्वांच्या शुभेच्छांमुळेच पुन्हा नगरला
मी जिल्हा परिषदेची सीईओ होते आणि आता जिल्हाधिकारी झाले. जिल्हा परिषदेच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात नगर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे, तसेच सर्व घटकांचे सहकार्य मिळाले. सर्वांच्या शुभेच्छांमुळेच माझी नगरला जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली.’’ रुबल अग्रवाल, नूतन जिल्हाधिकारी.