आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुबल अग्रवाल यांनी स्वीकारले जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नवनिर्वाचित जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी रविवारी प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार रजेवर असल्याने पदाचा अतिरिक्त भार जगताप यांच्याकडे होता. 7 फेब्रुवारीला अग्रवाल यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. मराठा आरक्षणासाठी ग्रामीण भागातील 158 गावे व शहरी भागातील 164 प्रगणक गटांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी, बँकांचा संप या पार्श्वभूमीवर सरकारने बदली झालेल्या अधिकार्‍यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अग्रवाल यांनी रविवारी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली.
सुवर्णजयंती राजस्व अभियान, आगामी लोकसभा निवडणुका व जिल्ह्यातील विकासाची कामे सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडू, असा विश्वास अग्रवाल यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, प्रांताधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.