आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rural Development Minister Jayant Patil, Latest News In Divya Marathi

पर्यावरणासाठी पुढाकार घ्यावा : जयंत पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ग्रामपंचायतीत लोकहिताचे काम करणारी माणसे असतील, तर काय होऊ शकते हे निंबळक ग्रामपंचायतीने दाखवून दिले. यापुढे या ग्रामपंचायतीने पर्यावरणासाठी पुढाकार घ्यावा. गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून तेच पाण्याचा पुनर्वापर करून पर्यावरणासाठी वापर करावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.निंबळक ग्रामपंचायतीस मंत्री पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, एकात्मिक बाल विकासचे अशोक पावडे, जिल्हा परिषद सदस्य कालिंदी लामखडे, राष्टÑवादीचे माधव लामखडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धारसकर, सरपंच विलास लामखडे, चंद्रकांत खाडे, अशोक पवार, घनश्याम म्हस्के, राजू रोकडे, ग्रामविस्तार अधिकारी युवराज ढेपे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील यांनी गावासाठी राबवण्यात येणा-या विविध योजनांची माहिती घेतली. या ग्रामपंचायतीचा कारभार व लोकहितासाठी राबवले जात असलेले उपक्रम प्रशंसनीय आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींनी या उपक्रमांचे अनुकरण करावे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. जिल्हा परिषदेने या ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असेही मंत्री पाटील म्हणाले. गावात घरोघरी मीटरने पाणी देणारी राज्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे. या उपक्रमाचे मंत्री पाटील यांनी कौतुक केले. अशा पद्धतीने पाणी वाटप उपक्रम राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी राबवला, तर पाण्याच्या गरजेपेक्षा जास्त वापराला आळा बसून पाण्याची मोठी बचत होईल. हेच वाचवलेले पाणी भविष्यकाळासाठी उपयोगी पडेल. राज्यातील पाणी टंचाई कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे पाटील यांनी सांगितले.