आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्क देशातील तज्ज्ञांची जिल्हा बँकेस भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सार्क देशातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांनी नुकतीच येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेस सदिच्छा भेट दिली. या पथकात बांगला देश, नेपाळ, श्रीलंका, इंग्लंड अमेरिकेतील प्रतिनिधींचा समावेश होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने पुण्यातील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरमध्ये सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी झालेले तज्ज्ञ नगरला आले होते. ‘नाबार्ड’चे उपसरव्यवस्थापक बडत्या, जिल्हा प्रबंधक राकेश पांगत आदी त्यांच्यासमवेत होते. पाहुण्यांचा सत्कार जिल्हा बँकेचे मुुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केला. बँकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती त्यांनी दिली. ही बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू आहे. शेतकरी कामगारांच्या आर्थिक जडणघडणीत बँकेचा मोठा वाटा आहे. बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा हप्ता बँकेने स्वनिधीतून भरला आहे. असा विमा हप्ता भरणारी देशातील ही एकमेव बँक आहे, असे त्यांनी सांगितले. बचत गटांना केवळ टक्के दराने वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महिला स्वयंनिर्भर होण्यास मोठी मदत झाली आहे, असे ते म्हणाले.
नगरची जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून रिझर्व्ह बँक, नाबार्ड राज्य बँक नेहमीच या बँकेच्या कामकाजाचे कौतुक करतात, असे पांगत यांनी सांगितले.

पथकातील तज्ज्ञांंनी बँकेच्या कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. आपल्या देशातील सहकार चळवळीची माहिती त्यांनी यावेळी दिली. नगर जिल्ह्याने सहकार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचे पाहुण्यांना विशेष औत्सुक्य होते. याप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक किशोर भिंगारकर, बाळासाहेब भोसले, सिद्धार्थ वाघमारे, बी. एस. घोडके, टी. जी. अकोलकर बँकेतील अन्य अधिकारी उपस्थित होते.
छायाचित्र: बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, इंग्लंड अमेरिकेतील सहकारी बँकक्षेत्रातील तज्ज्ञांनी नुकतीच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेस नुकतीच सदिच्छा भेट दिली.
बातम्या आणखी आहेत...