आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sachin Jadhav And Kalamakar Filed An Application For The Post Of Mayor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिन जाधव-कळमकर यांचे महापौरपदासाठी अर्ज दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापौरपदाच्या निवडणुकीसाठी युतीकडून सचिन जाधव, तर आघाडीकडून अभिषेक कळमकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोघांनीही दोन-दोन अर्ज दाखल केले आहेत. जाधव यांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या, तर कळमकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौरपदासाठी जूनला निवडणूक होणार आहे. महापौरपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महापौरपदासाठी अपेक्षित संख्याबळ जुळवताना युती आघाडीच्या नाकीनव आले आहेत. नगरसेवकांची पळवापळवी होऊ नये, यासाठी युती आघाडीच्या नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात आले आहे. मोजकेच नगरसेवक सध्या शहरात आहेत.

महापौरपदासाठी युतीचे जाधव आघाडीचे कळमकर यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. कळमकर यांनी सकाळी सव्वा अकरा वाजता, तर जाधव यांनी दुपारी साडेबारा वाजता अर्ज दाखल केला. यावेळी आमदार जगताप, नगरसेवक आरिफ शेख, कुमार वाकळे, विपूल शेटिया, संजय घुले अादी उपस्थित होते, तर जाधव यांनी सहकार राज्यमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुवेंद्र गांधी, विक्रम राठोड, दिलीप सातपुते, श्रीपाद छिंदम, मनेष साठे उपस्थित होते.
कळमकर यांच्या अर्जावर सुचक म्हणून संग्राम जगताप कुमार वाकळे, तर अनुमोदक म्हणून आरिफ शेख विपुल शेटीया यांची, तर जाधव यांच्या अर्जावर सूचक म्हणून अनिल शिंदे सुवेंद्र गांधी, तर अनुमोदक म्हणून दिलीप सातपुते संजय शेंडगेंची नावे आहेत.