आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समिती सभापतिपदी सचिन जाधव बिनविरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे सचिन जाधव यांची बिनविरोध निवड होणार आहे. प्रक्रिया शुक्रवारी सकाळी ११ वाजता होईल.
सभापतिपदासाठी शिवसेनेतर्फे जाधव यांनी बुधवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार ही शेवटची मुदत होती. परंतु विरोधकांनी निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकत अर्ज दाखल करण्याचे टाळले. त्यामुळे सभापतिपदासाठी जाधव यांचा एकमेव अर्ज आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता सभापतिपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जाधव यांची बिनविरोध निवड होणार असून त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता उरली आहे.

स्थायी समितीच्या रिक्त आठ जागांची निवड केल्यानंतर मनपा प्रशासनाने सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाने ऑगस्टला सभापती निवडीसाठी स्थायीची विशेष सभा बोलावली होती. पीठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवारी दुपारी पर्यंत मुदत होती. जाधव यांनी बुधवारीच आपला अर्ज दाखल केला. विरोधकांकडून शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल होईल, अशी अपेक्षा होती. परंतु विरोधकांनी निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकत अर्ज दाखल करणेच पसंत केले. त्यामुळे जाधव यांची बिनविरोध निवड होणार आहे. ते स्थायीचे ११ वे सभापती असतील. विशेष म्हणजे स्थायी सभापतीची निवड प्रथमच बिनविराेध होणार आहे. सभापतिपदामुळे महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व वाढणार आहे.

शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर
सत्ताधारी शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर करून चुकीच्या पध्दतीने आपल्या मर्जीतील सदस्य स्थायीवर पाठवले. विरोध करूनही त्यांनी बेकायदेशीरपणे ही निवड प्रक्रिया राबवली. त्यामुळे आम्ही सभापती निवडीवर बहिष्कार टाकला असल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...