आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सचिनची पत्नी अंजली शेतक-यांच्या घरी बाजरीची भाकरी व मिरच्याचा ठेसा खाते....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांशी संवाद साधताना अंजली.... - Divya Marathi
शेतकऱ्यांशी संवाद साधताना अंजली....
अहमदनगर- माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडूलकर यांनी रविवारी पाथर्डी तालुक्यातील करंजी गावाला धावती भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोणतीही पूर्वकल्पना न देता आलेल्या या अनाहूत पाहुण्यामुळे करंजी ग्रामस्थ मात्र चांगलेच भांबावले. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक आलिशान गाडी करंजी येथील भट्टेवाडी येथे दाखल झाली. या गाडीत नेमके कोण आहे म्हणून काही ग्रामस्थ गाडीच्या जवळ गेले असता त्या गाडीतून अंजली तेंडुलकर व त्यांच्या मावसबहीण श्रीमती कलीआ चाँदमाल या उतरल्या. चाँदमल या शेतीतज्ज्ञ असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करतात.
 
चाँदमल यांच्या विनंतीवरून ग्रामीण भागातील शेतीची पहाणी करण्यासाठी अंजली या भट्टेवाडी येथे आल्या होत्या. मात्र, त्या आल्याचे कळताच या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. करंजीच्या ग्रामस्थांनी अंजली यांचे यावेळी संत्रा मोसंबी आणि डाळिंबाची फळे देऊन स्वागत केले. करंजी येथील भटेवाडी येथे सोशल सेंटर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले जाते. 
 
अंजली यांची मावसबहीण श्रीमती कमीआ चाँदमाल व अ‍ॅलीक्स मायकल हे गोव्यातून करंजी येथील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी गेली आठ दिवसांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे आपली बहीण ग्रामीण भागात एका खेडेगावात नेमकं काय काम करतेय ते पाहाण्यासाठी सचिनची पत्नी अंजली यांनी थेट करंजी गाठली. यावेळी सखाराम क्षेत्रे, महादेव गाडेकर, पप्पू क्षेत्रे यांच्या शेतीमध्ये नैसर्गिक शेती कशा पद्धतीने करावी याचे प्रात्यक्षिक सुरू असून कुठल्याही प्रकारचे रासायनिक खते न वापरता तयार करण्यात आलेले चिकू, संत्रा, मोसंबी, केळी, वांगे, पालकभाजी, कोथिंबीर या फळबागांची पाहणी अंजली यांनी केली. काळ बदलत चालला असून उद्योगधंद्यांमध्ये थोडी मंदीची लाट असल्याने शेती हा तर शेतकऱ्यांच्या जीवन जगण्याचा महत्त्वाचा पर्याय असल्याने शेती करण्याची आवड असल्याचे अंजली यांनी सांगत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
 
राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या निधीतून भट्टेवाडी येथे सभामंडप व काँक्रीट रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी रफीक शेख यांनी तेंडुलकर यांच्याकडे केली. तेंडुलकर यांनी भट्टेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या घरीच दुपारचे जेवण घेत दूध आणि बाजरीची भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेसा घेत जेवण घेतले. जाताना या ठिकाणी मी सचिनला घेऊन येईन. शेतकऱ्यांच्या व्यथा सचिनला माहीत आहेत. काही गावे त्याने दत्तक म्हणूनही घेतली आहेत. बहिणीने राबवलेल्या उपक्रमाची पहाणी करण्यासाठी तुमच्या आवडत्या सचिनला पुढच्या वेळेस घेऊन येईन असे तेथून निघताना अंजली यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले.  
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...