आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadashiv Lokhande News In Marathi, Shiv Sena, Shirdi Lok Sabha Seat

शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेची उमेदवारी,आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या वतीने तशी अधिकृत घोषणा झाली नसली तरी लोखंडे बुधवारी (26 मार्च) दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली.


ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केलेला काँग्रेस प्रवेश हा शिर्डी मतदारसंघात शिवसेनेला बसलेला पहिला धक्का होता. त्यानंतर पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या माजी मंत्री बबन घोलप यांना अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी झालेली शिक्षा हा दुसरा धक्का ठरला. या धक्क्यातून सावरताना शिवसेनेला शिर्डी मतदारसंघात उमेदवार ठरवताना नाकी नऊ आले. अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदर मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास लोखंडे यांना मातोश्रीवरून एबी फॉर्म देण्यात आला. बुधवारी सकाळी अकरा वाजता ते शिर्डीत पत्रकारांशी बोलणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता निवडक शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती प्रा. गाडे यांनी दिली. नगर मतदारसंघात समावेश असणार्‍या जामखेड विधानसभा मतदारसंघाचे सन 1995 ते 2009 असे पंधरा वष्रे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.