आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रांमध्येही जाणवते साईबाबांची श्रद्धा व सबुरीची शिकवण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - "...या चित्रांमध्येही जाणवते साईबाबांची श्रद्धा आणि सबुरीची शिकवण' अशा शब्दांत अनेक भाविकांनी युवा चित्रकार योगेश हराळे यांनी रेखाटलेल्या साईबाबांच्या चित्रांचे कौतुक केले.

शिर्डीतील साईमंदिराजवळील द्वारकामाईसमोरील खुल्या नाट्यगृहात हराळे यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन सध्या सुरू आहे. ६ जानेवारीला प्रदर्शनाची सांगता होईल. नवीन वर्षानिमित्त शिर्डीत भाविकांची गर्दी उसळली आहे. त्यातील अनेकांना या प्रदर्शनाला भेट दिली. जम्मू काश्मिर, मध्यप्रदेश, गुजराथ, बिहार, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, नवी दिल्ली अशा विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी हराळे यांच्या चित्रकारीची प्रशंसा केली.

साईबाबा हयात असताना काढण्यात आलेल्या कृष्ण-धवल छायाचित्रांवरून हराळे यांनी कॅनव्हासवर अॅक्रेलिक रंगात मोठी १९ चित्रे तयार केली आहेत. काही चित्रे पेस्टल रंगात आहेत. या प्रदर्शनाचे उद््घाटन साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, वाकोडी परिसर ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे शरद तोडमल, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत काळे, प्रशांत कोते आदींच्या उपस्थितीत झाले.

रमणींकडून शुभेच्छा
शिर्डीत भव्य भक्तनिवास बांधणारे दानशूर साईभक्त के. व्ही. रमणी यांनी योगेश हराळे यांच्या प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी मी आता येऊ शकत नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. फ्रान्सहून डॉ. शशी धर्माधिकारी यांनीही चित्रांचे कौतुक करणारा ई-मेल पाठवला आहे. साईबाबा मंदिरातील पहिले पुजारी लक्ष्मण जाखडी यांचे नातू जगदीश जाखडी यांनी "ही चित्रे पाहून धन्य झालो,' असे उद्गार काढले.