आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबा संस्थान वरिष्ठ महाविद्यालय सुरू करणार; संस्थानचे अध्यक्ष हावरे यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- श्रीसाईबाबा संस्थानच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला अाहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. तसेच उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. 

श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या व्यवस्थापन समितीची सभा डॉ. हावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, ॲड. मोहन जयकर, विश्वस्त तथा नगराध्यक्ष योगिता शेळके कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल आदी उपस्थित होते. 

डॉ. हावरे म्हणाले, श्रीसाईबाबा संस्थानकडून सध्या श्रीसाईबाबा कनिष्ठ महाविद्यालय कार्यरत आहे. या महाविद्यालयात सन २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षात कला, वाणिज्य विज्ञान शाखेच्या इयत्ता अकरावीच्या १० तुकड्या असून इयत्ता बारावीच्या १० तुकड्या अशा एकूण २० तुकड्या कार्यरत आहेत. दोन्ही वर्गांमध्ये एकूण १३५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे. 
बातम्या आणखी आहेत...