आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - नाताळ सुटी व नववर्षानिमित्त शिर्डीत साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर मंगळवारी (31 डिसेंबर) दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. जनसंपर्क कार्यालयामार्फत देण्यात येणारे व्हीआयपी व अन्य पासेस 25 ते 31 डिसेंबर या काळात बंद राहणार आहेत. परिसरात फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.