आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saibaba News In Marathi, Shankaracharya, Divya Marathi

शंकराचार्यांनी साईपूजेला केलेला विरोध 13 आखाड्यांच्या प्रमुखांनी धुडकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - शंकराचार्यांनी साईपूजेला केलेला विरोध देशातील 13 आखाड्यांच्या प्रमुखांनी धुडकावून लावला. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणार्‍या साईबाबांबद्दल चुकीचे उद्गार काढून शंकराचार्यांनी समाज तोडण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडे जनतेने लक्ष देऊ नये. भक्तांनी साईसेवा सुरूच ठेवावी, असे आवाहन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते स्वामी बाबा हटयोगी व कल्की पीठाधीश्वर स्वामी प्रमोद कृष्णन यांनी केले.

आखाडा प्रमुखांनी शंकराचार्यांच्या विधानासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिर्डी येथे समिती पाठविली. त्या समितीने सुमारे दोन तास साई मंदिरातील सर्व धार्मिक पद्धती, पूजा, आरती याबाबत माहिती घेतली. शिर्डीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शंकराचार्यांनी साईबाबांबद्दल वादग्रस्त विधाने केल्याने देशभरात वाद निर्माण झाला. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्हाला पाठविले आहे. आज आम्ही शिर्डीतील साई मंदिरामधील पूजा पद्धती, आरत्या पाहिल्या. त्यात आम्हाला काहीही चुकीचे आढळले नाही. सनातन संस्कृतीचे जतन होत असल्याचे त्यातून आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शंकराचार्यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असे ते म्हणाले.