आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डीत चार दिवसांत पावणेचार काेटींचे दान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - शिर्डीतील श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव काळातील चार दिवसांत तीन कोटी ७५ लाखांचे विक्रमी दान भक्तांकडून साईचरणी अर्पण करण्यात अाले. यामधे ८६५ ग्रॅम सोने तर साडेतीन किलो चांदीचा व परकीय चलनाचाही समावेश आहे
साईबाबांना पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी भरभरून दान अर्पण केले. शुक्रवारी दिवसभर या दानाची मोजदाद करण्यात आली. दसऱ्याच्या मुहूर्तावर चार दिवसांत साईबाबांना ३ कोटी ७५ लाखांचे विक्रमी दान प्राप्त झाले असून यात सोने, चांदी, रोख रकमेचा समावेश आहे. साई संस्थानच्या दक्षिणा पेटीत १ कोटी ९३ लाख, देणगी काउंटरवर ९३ लाख, ऑनलाइन डोनेशनद्वारे २६ लाख तसेच सात लाखांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. यासोबत २३ लाखांचे ८६५ ग्रॅम सोन्याचे दागिने तर साडेतीन किलो चांदी साईबाबा यांच्या चरणी अर्पण करण्यात आली.
दसऱ्याच्या दिवशी वेंकचा अटुलरी या भाविकाने ७५० ग्रॅम वजनाचा २२ लाखांचा सोन्याचा मुकुट, तर एका अज्ञात भाविकाने अडीच लाखांचा हिरेजडित मुकुट साईचरणी अर्पण केल्याची माहिती साई संस्थाकडून देण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...