आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र :11 दिवसांत साईबाबांच्‍या दानपेटीत 12 कोटी रूपयांची भर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - नववर्ष आणि नाताळच्‍या सुट्यांमध्‍ये शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या मंदिरात देशभरातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. शिर्डीमध्‍ये दान करण्‍यासाठी भाविक प्रसिद्ध आहेत. 11 दिवसात साईबाबांच्‍या दानपेटीत तब्बल 12 कोटी रूपयांची भर पडल्‍याची माहिती मिळाली आहे.

साई समाधी सोहळा 2018 मध्‍ये होणार आहे. त्‍यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला म्‍हणून संस्‍थानच्‍या वतीने नवीन बँक खाते उघडण्‍यात आले आहे. शिर्डीमध्‍ये राज्यातूनच नव्हे तर देशाच्‍या कानाकोप-यातून येणा-या भाविकांची संख्‍या अधिक आहे. दरवर्षी साईभक्‍त शिर्डीमध्‍ये मोठ्या प्रमाणात दान करतात.

- डिसेंबर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यापासून शिर्डीत भाविकांची गर्दी वाढली होती.
- नवीन वर्षाच्‍या सुरूवातीला लाभो भाविकांनी शिर्डीत माथा टेकवला.
- अकरा दिवसात भाविकांनी देणगी स्वरुपात 11 कोटी 87 लाख रूपये जमा केले.
- मागील वर्षीच्‍या तुलनेत यंदा 1 कोटी रूपयांनी दानाच्‍या रकमेत वाढ झाली.

1 किलो सोने, 21 किलो चांदी
रोख पैशाच्‍या स्‍वरूपात भाविकांनी दान केले, शिवाय 1 किलो 213 ग्रॅम सोने व 21 किलो चांदीही साईबाबांच्‍या दरबारात अर्पण करण्‍यात आली. आगामी साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी केलेल्‍या आवाहनाला भाविकांचा प्रतिसाद लाभत आहे.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल...
पीटरच्‍या याचिकेवरील सुनावणी 16 जानेवारीपर्यंत स्‍थगित..

बातम्या आणखी आहेत...